कृपया “ॐ गं गणपतये नमः” या जप नोंदणीसाठी खालील फॉर्म भरा.

Are you human?

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापनेला या वर्षी १२५ वर्ष पुर्ण होत आहे. ट्रस्ट मार्फत गेली अनेक वर्ष सार्वजनिक स्तरावर अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेतच. याच परंपरेला साजेसा गणेशाचा बीजमंत्रचा जपयज्ञाचा सोहळा १३/६/२०१७ ते २७/६/२०१७ दरम्यान मोठ्या उत्साहात जगभर साजरा करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.

१३/६/२०१७ ला साजरी होणारी अंगारक चतुर्थी आणि २७/६/२०१७ ला साजरी होणारी विनायक अंगारक चतुर्थी यादरम्यान आलेल्या शुभकाळाला कन्यागत पर्व काळाची जोड मिळाली आहे, त्यामुळे यादरम्यान केलेल्या बीजमंत्राचा जप सर्व भक्तांसाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे.

तब्बल २ आठवडे चालणाऱ्या या महायज्ञात तुम्ही घरबसल्या सहभागी होऊ शकता.
आपण जागतिक स्तरावरील जपयज्ञात सहभागी होत गणपती बाप्पा समोर नतमस्तक होऊन आपली एक समिधा अर्पण करूया!

चला तर मग ऑनलाईन नोंदवा आपले नाव आणि सामिल व्हा या जपयज्ञाच्या महासोहळ्यात कारण या मंत्रोच्चाराने मिळणारी मानसिक शांतता आजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या आमच्यासारख्या भक्तांना अंतर्मुख करायला लावेल हे नक्की… !