प्रसिद्धीसाठी माहिती

दिनांक :-१३ सप्टेंबर २०१६

अपंग जवान
about dagdusheth ganapati

पुणे – यंदाच्या १२४ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सर्वच थरातील भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व देवीसिंग शेखावत, त्रिपुराचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन मंत्री हरीष रावल, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिपील वळसेपाटील, माजी केंद्रीय मंत्री गुरूदास कामत यांच्यासह पोलिस अधिकारी मकरंद रानडे, चंद्रशेखऱ दैठणकर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अभिनेत्री श्रृती मराठे, अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत, अभिनेता राहुल सोलापूरकर अशा अनेकांनी आज दर्शनासाठी मंडपात हजेरी लावली. त्यात जोडो भारत अभियानचे समन्वयक सेवाग्राम संस्थेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील विनायकराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह येऊन गणरायाकडे काश्मिरमध्ये शांतता नांदवी यासाठी प्रार्थना केली. शत्रुशी सीमेवर झुंजताना जायबंदी झालेल्या अपंग जवांनांनी व्हीलचेअरवर येऊन गणेशाची आरती केली आणि सीमेवर शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.

पुढे वाचा

दिनांक :-१२ सप्टेंबर २०१६

विविध रंगांची उधळण करणारा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज असलेला श्री गणनायक रथ
about dagdusheth ganapati

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची उत्सव मंडपात कऱण्यात येणारी सजावट हा जसा एक चर्चेचा विषय असतो तसाच विसर्जन मिरवणुकीतील रथाचेही आकर्षण लोकांच्यात आहे. यंदा विसर्जनसाठी पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारीत श्रीगणनायक रथ तयार कऱण्याता आला आहे.

या रथाला सुमारे सव्वालाख दिवे लावण्यात आले आहेत. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनुसार यंदा प्रथमच नीळा, लाल, पिवळा, जांभळा आणि केशरी या पाच रंगात रथ रंगविण्याता आला आहे. रथाला पाच कमानी आणि बारा खांब आहेत. प्रत्येक खांब पाच भागात विभागला गेला आहे. या पंचमहाभूतांना एकत्रित ठेवणारा सूर्य म्हणून श्री गणेश मूर्तीच्या आसनाच्या मागे सूर्य दाखविला आहे.

या खांबांना क्रिस्टलच्या माळा आणि लोलक लावून सजविण्यात आले आहे. या रथावर एकून तीस एईडीपार असून त्यामुळे मोतीया रंगाबरोबरच विविध रंगांची उधळण करीतच श्री गणनायक रथ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईल.

पुढे वाचा

दिनांक :-११ सप्टेंबर २०१६

about dagdusheth ganapati पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. भाविकांनी श्री गणेशाच्या चरणी दानपेटीत अर्पण केलेल्या या पैशातून हे प्रकल्प सुरू केले आहेत. याची अद्ययावत माहिती भाविकांपर्यंत पोचविण्यासाठी वेबसाईट, व्ट्रीटर, फेसबुक अशा अधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सुरू केला आहे. या सोबतच घरी गणयाराचे दर्शन घेता यावे आणि अन्य माहिती मिळावी यासाठी ट्रस्टने गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला ऍन्ड्रॉइड ऍप भाविकांसाठी खुले केले असून त्याला परदेशातूनच सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येते. स्पेक्ट्रमच्या जमान्यातही ट्रस्टने समय के साथ चलो हेच धेय्य ठेवले आहे. त्यामुळेच दगडूशेठ नावाचे स्वतंत्र ऍप तयार करून घेतले आणि गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला ते भाविकांसाठी खुले केले. गुगलच्या प्लेस्टोअरमधून ते ऍप मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात सुमारे एक हजारांपर्यंत भाविकांनी ते मोबाइलसह लॅपटॉप संगणाकवर ते सहजपणे डाऊनलोड करता येते. हे ऍप ज्यांनी बघितले त्यापैकी अनेकांनी त्याबद्दलच्या प्रतिक्रीया कळविल्या आहेत. त्यात या ऍपला पंचतारांकीत रेटिंग देणा-यांची संख्या ९९ टक्के आहे.
पुढे वाचा

दिनांक :-१० सप्टेंबर २०१६

कुष्ठरूग्णांच्या कुटुंबियांकडून श्रींची आरती
about dagdusheth ganapati

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडपात आज सकाळी कोंढवा येथील कुष्ठरूगणांच्या कुटुंबियांनी श्रींची महापूजा करून आरती केली. त्याचवेळी आरोग्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची शक्ती दे असे सांकडे श्रींच्याचरणी त्यांनी घातले. त्यानंतर काही वेळातच मोगरावहून चिंचवडकडे प्रस्थान ठेवलेल्या गाणपत्य श्री मोरया गोसावींची पालखी उत्सव मंडपात आली. तसेच एका गणेश भक्ताने ससून रूग्णालयातील रूग्णांसाठी २१ पोती बासमती तांदुळ देण्याचे श्रींच्या समोरच जाहीर केले आहे.

कोढवा येथील कुष्ठरूग्णांच्या पुर्नवसानासाठी डॉ. जाल मेहता यांनी भरीव काम केले आहे. तसेच त्यांनी ट्रस्टला दिलेल्या पहिल्या रुग्णवाहिकेव्दारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने रूग्णसेवेचे काम सुरू केले. याच ऋणानुबंधातून कुष्ठरूग्णांच्या औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी काही वर्षापूर्वी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी ट्रस्टच्यावतीने आर्थिक मदत करून त्यांचा कारखाना सुरू करून दिला होता.

पुढे वाचा

दिनांक :-९ सप्टेंबर २०१६

about dagdusheth ganapati

पुणे – यंदाच्या गणेशोत्सवात शासकीय आदेशामुळे आलेले विघ्न पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मध्यस्तीने दूर झाल्याने कार्यकर्तेही पुन्हा एकदा नव्या उत्साहाने कामाला लागले आहेत. यंदाच्या उत्सवातील पाचच दिवस शिल्लक राहिलेले असल्याने आता भाविकांची गर्दी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वाढू लागली आहे. पहाटे शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण सुरू असल्यापासून भाविकांची रांग बघायला मिळाली. या गर्दीत सामान्य भाविकांबरोबरच मान्यवरांचीही संख्या वाढू लागली आहे. दरवर्षी गौरी आवाहन किंवा पूजनाच्या दिवशी दर्शनाला येण्याची प्रथा सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी मुजुमदार आणि मुलगी स्वाती मुजुमदार यांनी आज कायम राखत कुटुंबासह येऊन श्रींचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजयसिंग हे आज पुण्यात कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यांनी विमानतळावरून पहिली धाव श्रींचे दर्शनासाठी उत्सव मंडपात घेतली. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेतले.

पुढे वाचा

दिनांक :-७ सप्टेंबर २०१६

about dagdusheth ganapati

पुणे – सर्वेपि सुखिन संतु सर्वे संतु निरामया: अशी प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी योगगुरू श्री श्री रवीशंकर यांनी आज केली. दरम्यान काल मंगळवारी रात्रीपासून श्रींच्या मंडपात वारक-यांनी हरीजागर केला. त्याची सांगता पहाटेच्या काक़ड आरतीने झाली. बालुशाहीचा नैवेद्या श्रींना अर्पण करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी माध्यानीच्या सुमारास योगगुरू श्री. श्री. रवीशंकर यांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या उत्सव मंडपात आगमन झाले. यावेळी त्यांचा शिष्य समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. मंडपात आल्यावर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, श्री महेश सूर्यवंशी यांनी त्याचे स्वागत केले. देशवासीयांनी उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्री. श्री. रवीशंकर यांनी गणेश पूजनाच्यावेळी संकल्प सोडला. त्यानंतर श्रींची महाआरती करून सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरामया: अशी प्रार्थना त्यांनी गणरायाच्याकडे केली.

दरम्यान, मंगळवारी रात्री श्रींच्या उत्सव मंडपात वारक-यांनी हरीजागर केला. या भजनाची सांगता पहाटेच्या श्रींच्या काकड आरतीने झाली. त्यानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. गणेशोत्सवात उत्सव मंडपात हरीजागर करण्याची प्रथा वारकरी मंडळींनी स्वच्छेने सुरू केली असून या सार्वजनिक गणेशोत्सावातील सहभागासाठी त्यांनी हा भजनाचा कार्यक्रम सुरू केला आहे.

पुढे वाचा

दिनांक :-६ सप्टेंबर २०१६

दि.५ सप्टेंबर गणेश आगमनानंतर श्रींना मोदकांचा नैवेद्या
about dagdusheth ganapati

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडप आणि परिसरातील पोलिस बंदोबस्ताबरोबरच, ट्रस्टने केलेल्या सुरक्षा विषयक योजनांची महिती आणि महत्वाचे म्हणजे सीसीटीव्ही नेटवर्क आदीचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी काल घेतला. त्यानंतर त्यांनी काही मौलिक सूचनाही केल्या. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने उभारलेल्या महाबलिपूरमच्या प्रतिकृतीवरील विद्यूत रोषणाईचे उदघाटन करण्यासाठी आले होते. श्रींची आरती केल्यावर त्यांनी विद्यूत रोषणाईचे उदघाटन केले आणि सुरक्ष विषयक यंत्रेणा व उपाय योजनांचा आढावा घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने उत्सव मंडपात खाजगी सुरक्षा रक्षकांची नियक्ती केली आहे. तसेच मंडप आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचे नियंत्रण कक्षात जाऊन महासंचालकांनी कुठे कॅमेरे बसवले आहेत व त्यामुळे किती परिसराचे चित्रण होते? ते चित्रीकरण रात्रीच्या वेळी कसे दिसते याची प्रत्यक्ष पहाणी केली.

पुढे वाचा