प्रसिद्धीसाठी माहिती

दिनांक :- १८ मार्च २०१८

हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा ३४ वा वर्धापनपदिन ; गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य प्रवेश

about dagdusheth ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान दि.१८ ते २५ मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत विविध सांगितीक कार्यक्रम होणार आहेत. गुढीपाडव्याला सायंकाळी ७.३० वाजता महोत्सवाचे उद््घाटन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

पुढे वाचा

दिनांक :- २८ फेब्रुवारी २०१८

चिमुकल्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्पांतून उलगडली विज्ञानाची गुपीते

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ; जय गणेश पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन

about dagdusheth ganapati

पुणे : एटीएम मशिनचे निराळे स्वरुप… प्रोजेक्टरच्या मदतीने दृश्य दाखविण्याची यंत्रणा…हवेचा दाब व पदार्थाचे वस्तुमान दर्शविणारा दिशादर्शक…पाण्याचा हापसा वापरुन केलेले बल्ब हिटर अशा एकाहून एक सरस प्रकल्पांमधून चिमुकल्यांनी विज्ञानाची गुपीते उलगडली. पाणी वाचवाचा संदेश, पर्यावरणाची हानी रोखण्याचे आवाहन करीत विद्यार्थ्यांनी सामाजिक जागृतीची भावनाही यावेळी प्रकट केली.

पुढे वाचा

दिनांक :- १९ फेब्रुवारी २०१८

अफजलखान वधातून उलगडली शिवरायांची युद्धनिती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे शिवजयंतीनिमित्त जीवंत देखावा

about dagdusheth ganapati

पुणे : बलाढय अफजलखानाने महाराष्ट्रात तुळजापूर, पंढरपूरवर केलेला हल्ला… स्वराज्यावर ओढावलेल्या संकटामुळे चिंताग्रस्त झालेल्या राजमाता जिजाऊंच्या मनाची घालमेल… मावळ्यांसोबत शिवरायांनी अफजलखानाचा सामना करण्याकरीता आखलेली रणनिती आणि चतुर युद्धनितीने केलेला अफजलखान वधाचा चित्तथरारक प्रसंग तब्बल ५० कलाकारांनी रंगमंचावर जीवंत केला.

पुढे वाचा

दिनांक :- ७ फेब्रुवारी २०१८

‘दगडूशेठ’ च्या महिला सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा

गणपती मंदिराच्या परिसरात सापडलेले १२ हजार रुपये फरासखाना पोलिसांकडे सुपूर्द

about dagdusheth ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेच्या परिसरात मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला १२ हजार रुपये रोख रक्कम रस्त्यावर पडलेली आढळली. आजूबाजूला चौकशी केली असता, कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षारक्षक रुपाली शेडे यांनी याबाबत ट्रस्टच्या विश्वस्तांना कळविले. एवढी मोठी रक्कम स्वत: न घेता प्रामाणिकपणे फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये जमा करुन शेडे यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पुढे वाचा

दिनांक :- २१ जानेवारी २०१८

शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला ग सखे…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने गणेशजन्म सोहळा; मंदिरामध्ये अलोट गर्दी

about dagdusheth ganapati

पुणे : माघ चतुर्थीला पाळणा हलला… शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला ग सखे… गणेश जन्मला… असा पाळणा म्हणत तब्बल २५१ महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. ओम् गं गणपतये नम: च्या मंगल स्वरांनी दुपारी ठीक १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठया थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक पुष्परचना आणि गाभा-यात केलेली सजावट डोळ्यात साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्य आणि सुख-शांतीकरीता प्रार्थना केली.

पुढे वाचा

दिनांक :- २१ जानेवारी २०१८

गणेशजन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक, मिरवणूक आणि गणेश जागर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन ; फुलांची आरास व विद्युतरोषणाई

about dagdusheth ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच रविवार, दिनांक २१ जानेवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार असून नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी ६ वाजता मंदिरापासून निघणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

पुढे वाचा

दिनांक :- २४ डिसेंबर २०१७

नृत्य, नाटयाच्या माध्यमातून घडले संस्कृती व इतिहासाचे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

about dagdusheth ganapati

पुणे : रंगीबेरंगी पोषाखात नटलेले चिमुकले… चेह-यावर उमटलेले निरागस भाव… पारंपारिक, ऐतिहासिक, देशभक्तीपर गीतांवर बालचमुंनी सादर केलेले नृत्यप्रकार… अशा उत्साही वातावरणात चिमुकल्यांनी नृत्यसादरीकरणातून आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे दर्शन घडविले. जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट प्रस्तुत महाराष्ट्रव्यापी जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते.

पुढे वाचा

दिनांक :- १७ डिसेंबर २०१७

सज्जनांच्या संघटनशक्तीमुळेच आपल्या अस्तित्वाचे रक्षण शक्य

जगन्नाथ पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा व आशिर्वाद प्रवचन

about dagdusheth ganapati

पुणे : महाराष्ट्रामध्ये भगवान गणेशाची उपासना मोठया प्रमाणात केली जाते. लोकमान्य टिळकांनी हिंदूंच्या अस्तित्वाचे रक्षण व्हावे, यासाठी गणेशपूजेला प्रोत्साहन दिले. देशातील इतर प्रांतांमध्ये देखील आता गणेशपूजा मोठया प्रमाणात होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सण शास्त्रीय अनुष्ठानानुसार साजरे होत नाहीत. दिपावलीमध्ये वाढणा-या प्रदूषणाने वातावरण मलिन होत आहे. त्यामुळे शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करीत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्याकरीता सज्जनांची संघटनशक्ती होणे आवश्यक आहे. ईश्वर, धर्म आणि संघटनशक्ती हेच अस्तित्वरक्षणाचे योग्य मार्ग आहेत, असे प्रतिपादन जगन्नाथ पुरी पीठाचे प.पू. श्री मज्जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.

पुढे वाचा

दिनांक :- १७ डिसेंबर २०१७

जगन्नाथ पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ गणपतीची पूजा व प्रवचन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन; पुणेकरांना पादुका दर्शनाची संधी

about dagdusheth ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा व आशिर्वाद प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर जगन्नाथ पुरी पीठाचे प.पू. श्री मज्जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वस्ती महाराज स्वामी हे पुण्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुढे वाचा

दिनांक :-१९ सप्टेंबर २०१७

‘दगडूशेठ’ चा देखावा उतरविताना जखमी झालेला कामगार सुखरुप घरी

श्रुबी हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज ; गणपती मंदिरात केली बाप्पाची आरती

about dagdusheth ganapati

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेल्या ब्रह्मणस्पती मंदिरावरील कळस उतरविताना क्रेन सर्व्हिसेस मधील राम जाधव (वय २९) यांना दिनांक २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अपघात झाला होता. रुबी हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ.आनंद काटकर यांच्याकडून संपूर्ण उपचार घेतल्यानंतर मंगळवारी (दि.१९) जाधव यांना डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, राजेंद्र घोडके, बाळासाहेब रायकर, उल्हास भट यांसह विश्वस्त उपस्थित होते. गणेश विसर्जनाच्या आधी सांगता मिरवणुकीकरीता दगडूशेठ गणपतीची मुख्य देखाव्याशेजारील दोन्ही रस्त्यावरील सजावट उतरविताना हा अपघात झाला होता.

पुढे वाचा