श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
“श्री गणेश महायज्ञ सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुकांना मंदिर प्रांगणात सोहळ्याच्या कालावधीत अत्यंत दुर्लभ व पवित्र यज्ञाचे विधी स्वहस्ते करायची सुवर्णसंधी ट्रस्ट तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महायज्ञ सोहळ्याचा कालावधी – १० जुलै २०१७ ते १७ ऑगस्ट २०१७

स्थळ – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे

वेळ – सकाळी ८ ते १२:३० आणि दुपारी १२:३० ते ५

यज्ञासाठीचे देणगी शुल्क – फक्त २१,००० रुपये

या महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे.
नोंदणी केल्यानंतर आमचे प्रतिनिधी स्वतः संपर्क साधून इच्छुकांच्या सर्व शंकांचे निरसन करतील.
गणेश भक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

महायज्ञ सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी:
सोहळ्याचा कालावधी , दिनविशेष, तारीख व वारानुसार होणारे विशेष यज्ञ यांची माहिती खाली वाचावी !

कृपया नोंदणीसाठी खालील फॉर्म भरा.

यज्ञासाठीचे देणगी शुल्क २१००० रुपये मला मान्य आहेत.
Are you human?

वेळ सकाळी ८ ते १२:३०

वेदमूर्ती मिलिंद यशवंत राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली श्रींच्या मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम

दिनांक ८ जुलै २०१७

सायंकाळी ५ वाजता यज्ञाचे प्रमुख यजमान ह्यांना प्रायश्चित विधी व देह शुद्धी करीता दशविध स्नान

शुभारंभ : गणेश पंचायतन यज्ञ

दिनांक ९ जुलै

सकाळी ८ वाजता मुख्य पुजेस प्रारंभ व लोककल्याणाकरीता प्रधान संकल्प , गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृका पूजन , नंदी श्राद्ध , आचार्य वर्णन , सर्व ब्रह्म्वृंदांचे पूजन , कुंडपूजन , धर्मध्वज स्थापन , (मुख्य मंदिरावरील ध्वज स्थापना) वास्तुमंडल स्थापना , योगिनी मंडल स्थापना , क्षेत्रपाल मंडल स्थापना , गणेशभद्र मंडल स्थापना , सर्वतोभद्र (विष्णू ) मंडल स्थापना, गौरीतिलक(देवी) मंडल स्थापना, द्वादशलिंगतोभद्र (शिव) स्थापना , सूर्यमंडळ (रवि) स्थापना , मुख्यदेवता गणेश , शिव , विष्णू , देवी , सूर्य स्थापना

ब्रह्मणस्पती सुक्त होम

सोमवार दिनांक १० जुलै ते गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट

श्री दत्त याग

जुलै महिन्याचे गुरुवार १३, २०, २७ जुलै व ऑगस्ट महिन्याचे गुरुवार ३, १० ऑगस्ट

गुरुदत्तात्रयाचे श्रीनृसिंह सरस्वतीकृत दत्तअष्टकाचे हवन व दत्त सहस्त्रनाम पठन होईल .

दिनांक वार होम विशेष
१२ जुलै बुधवार (संकष्टी) श्री गणेश लक्ष दुर्वार्पण करण्यात येईल
१६ जुलै रविवार अष्टमी (महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीस कुंकुमार्चन करण्यात येईल)
१९ जुलै बुधवार (एकादशी) लक्ष्मीऋदयम नारायण ऋद्यम स्तोत्र
२१ जुलै शुक्रवार (प्रदोष) रुद्र बिल्वार्चन करण्यात येईल
२३ जुलै रविवार सूर्य सुक्त व सूर्यास सहस्त्र दुर्वार्चन करण्यात येईल
२४ जुलै बुधवार (विनायकी चतुर्थी ) २१ सत्यविनायक पूजन व कथा निरूपण
३१ जुलै सोमवार दुर्गा सहस्त्र कुंकुमार्चन व त्याचे हवन करण्यात येईल
२४ जुलै, ३१ जुलै , ७ व १४ ऑगस्ट श्रावणी सोमवार ह्या दिवशी रुद्राची विशेष पूजा (पंचवक्त्र पूजन व बिल्वार्चन करण्यात येईल )
३ ऑगस्ट गुरुवार संतान गणपती पूजन व त्याचे हवन करण्यात येईल
७ ऑगस्ट सोमवार – चंद्रग्रहण (नारळी पौर्णिमा) ह्या दिवशी श्री गणेशास सहस्रावर्तन व सहस्रावर्तनात्मक गणेश हवन करण्यात येईल
११ ऑगस्ट शुक्रवार (संकष्टी चतुर्थी ) चंद्रोदय ९:४० श्री गणेशाच्या विविध नावांच्या बीजमंत्रानी हवन करण्यात येईल
१४ ऑगस्ट सोमवार (श्रीकृष्ण जयंती) ह्या दिवशी गोपालसहस्त्रनाम व सुदर्शन याग करण्यात येईल
१५ ऑगस्ट सोमवार श्रीं च्या मंदिरात विश्वशांती यज्ञ करण्यात येईल
१८ ऑगस्ट गुरुवार पुर्णाहुती : सकाळी ८ वाजता कार्यक्रमास सुरुवात. ४ वेदांचे शांतिपाठ, स्थापित देवतांचे पूजन व उत्तरांग पूजन , बलिप्रदान व पुर्णाहूती मंगल आरती प्रसाद

वेळ दुपारी १२:३० ते ५

वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली श्रींच्या मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम

रविवार दिनांक ९ जुलै (गुरुपौर्णिमा) ते शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट (अजा एकादशी ) ४१ दिवस

९ जुलै शुभारंभ महासंकल्प

गणपती पूजा , पुण्याहवाचन , महासंकल्प अंकुरार्पण , प्रतिसरबंद , नांदीश्राद्ध

सकाळी ८ वाजता मुख्य पुजेस प्रारंभ व लोककल्याणाकरीता प्रधान संकल्प , गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृका पूजन , नंदी श्राद्ध , आचार्य वर्णन , सर्व ब्रह्म्वृंदांचे पूजन , कुंडपूजन , धर्मध्वज स्थापन , (मुख्य मंदिरावरील ध्वज स्थापना) वास्तुमंडल स्थापना , योगिनी मंडल स्थापना , क्षेत्रपाल मंडल स्थापना , गणेशभद्र मंडल स्थापना , सर्वतोभद्र (विष्णू ) मंडल स्थापना, गौरीतिलक(देवी) मंडल स्थापना, द्वादशलिंगतोभद्र (शिव) स्थापना , सूर्यमंडळ (रवि) स्थापना , मुख्यदेवता गणेश , शिव , विष्णू , देवी , सूर्य स्थापना

दररोजचे पूजा विधी

रोज महान्यासमंत्र घोष , रुद्र एकादशनी , सप्तशती पाठ , दररोज दोन गणपतीच्या स्वरूपाचे होम , रुद्र होम , गणपती बाप्पांना अकरा प्रकारचे अभिषेक , गणेश सहस्त्रनाम अर्चना , शुक्रवारी ललिता सहस्त्रनाम अर्चना

९ जुलै ते १८ ऑगस्ट

अतीरुद्र (११०००) आणि सहस्त्रचंडी (१००८)

(जप व याग दोन्ही)

परमपूज्य शंकराचार्य श्री कांची पीठ यांनी विशेष उपदेश करून दिलेल्या श्री गणेशांच्या खालीलप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपाचे होम

सोमवार १० जुलै २०१७ ते शनिवार ५ ऑगस्ट २०१७ मंदिरात होतील

दिनांक होम श्री गणपती स्वरूप
१० जुलै सोमवार मृत्युंजय होम वल्लभ महागणपती, लक्ष्मी गणपती
११ जुलै मंगळवार दुर्गा होम सिद्धी गणपती, त्रैलोक्यमोहन गणपती
१२ जुलै बुधवार महाविष्णू होम क्षिप्र प्रसाद गणपती, कुक्षी गणपती
१३ जुलै गुरुवार गुरू होम अर्क गणपती, नर्तन गणपती
१४ जुलै शुक्रवार महालक्ष्मी होम स्वर्णकर्सण चिंतामणी गणपती, विघ्नराज गणपती
१५ जुलै शनिवार नवग्रह होम योग गणपती, संतान गणपती
१६ जुलै रविवार सूर्य होम शिव अवतार गणपती, मोहन गणपती
१७ जुलै सोमवार शंकर होम बुद्धी गणपती, कुमार गणपती
१८ जुलै रविवार सरस्वती सूक्त होम श्वेतार्क गणपती, नवनीत गणपती
१९ जुलै सोमवार पुरुषसूक्त होम दुर्व गणपती, ब्रह्मणस्पती गणपती
२० जुलै गुरुवार दक्षिणामुर्ती होम वक्रतुंड गणपती, शक्ती गणपती
२१ जुलै शुक्रवार लक्ष्मीनरसिंह होम गुरू गणपती, ऋणहर गणपती
२२ जुलै शनिवार नक्षत्र होम हरिद्रा गणपती, उच्चीष्ट गणपती
२३ जुलै रविवार अरुणप्रश्न होम वीवी गणपती, तरुण गणपती
२४ जुलै सोमवार ब्रम्हसूक्त होम विजय गणपती, दुर्गा गणपती
२५ जुलै मंगळवार हयग्रीव होम वल्लभ महालक्ष्मी गणपती, अभिष्टवरद गणपती
२६ जुलै बुधवार नारायण सुक्त होम वामन गणपती, मोदक गणपती
२७ जुलै गुरुवार मेघा दक्षिणामुर्ती होम राज गणपती, प्रयोग गणपती
२८ जुलै शुक्रवार स्वयंवर पार्वती होम आपतसकाय गणपती, मोद गणपती
२९ जुलै शनिवार अष्टदिशा होम किरत्न गणपती, एकाक्षर गणपती
३० जुलै रविवार भाग्यसूक्त होम महाविद्या गणपती, निधी गणपती
३१ जुलै सोमवार मृत्यूसूक्त होम सर्व शक्ती गणपती, सुवर्ण गणपती
१ ऑगस्ट मंगळवार आयुष्यसूक्त होम भोग गणपती, वीर गणपती
२ ऑगस्ट बुधवार महासुदर्शन होम विघ्नहर गणपती, पुष्टी गणपती
३ ऑगस्ट गुरुवार पर्जन्य होम बाल गणपती, क्षिप्र प्रसाद गणपती
४ ऑगस्ट शुक्रवार अष्टलक्ष्मी होम सृष्टी गणपती, वीरी वीरी गणपती
५ ऑगस्ट शनिवार संतान गोपालकृष्ण होम संकटहर गणपती
६ ऑगस्ट रविवार आवहंती होम

सोमवार ७ ऑगस्ट ते बुधवार १६ ऑगस्ट : सहस्त्रचंडी पारायण होम , १००८ जप व होम

गुरुवार १७ ऑगस्ट : अतिरुद्र होम , ११००० जप व होम

शुक्रवार १८ ऑगस्ट : तेहतीस कोटी देवतांना पूर्णाहुती , महामंगल आरती

होमास बसणाऱ्या यजमानांना सूचना

  • होमाच्या वेळेपूर्वी यजमानांनी अर्धा तास आधी उपस्थित राहावे
  • होमाला सोवळे ट्रस्टच्या वतीने दिले जाईल
  • होमाला एकाला किंवा जोडीने बसता येईल
  • होमासाठीचे देणगी शुल्क रुपये २१,०००/- फक्त भरून त्याची पोच ट्रस्टकडून घ्यावी
  • प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल
  • यजमानांनी कोणत्याही गुरुजींना दक्षिणा देऊ नये ट्रस्टच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे
  • होमाला बसलेल्या यजमानांनी मोबाईल फोनचा वापर करू नये
  • यजमानांनी यागाच्या दिवशी उपवास करावा
  • यागालाा बसताना पुरुषांनी सोवळे नेसावे व महिलांनी साडीवेश परिधान करावा
  • यागाला बसणाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा संकल्प सोडण्याकरीता गोत्र , नक्षत्र सांगावे