सेवा:

आरक्षणासाठी पुढील पत्त्यावर ई मेल पाठवावा; jayganesh.dhgt@gmail.com किंवा संपर्क +९१ २० २४४७९२२२

गणेश उत्सवातील सेवेसाठी पर्याय
उत्सवाच्या काळात ११ दिवस प्रसाद वाटपसाठी
(दररोज ४०० किलो प्रसाद)
उत्सवाच्या काळात गणेशयाग
महा अभिषेक देणगी रु. ५००/-

Note: गणेशोत्सवाच्या काळातील सेवेसाठी वरील पत्त्यावर संपर्क साधा..

दगडूशेठ गणपती गणेश उत्सव २०१६

गणेश चतुर्थी

प्रतिवर्षी गणेशचतुर्थीला श्रींच्या मंदिरामध्ये सकाळी श्रींची मंगलार्ती होते, आपल्या गणपती बाप्पाला सर्व वस्त्रालंकारांनी सजविण्यात येते. श्रींचे त्या दिवशी अत्यंत प्रसन्न व विलक्षण सुंदर असे रूप पाहून भक्तीभावाने सर्व भाविक नतमस्तक होतात. फुलांच्या सुंदर अशा रथामधुन श्रींची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. असंख्य कार्यकर्ते ढोल, ताशे, बँड, नगारे अशा अत्यंत उत्साही वातावरणात श्रींची मिरवणूक गणेशोत्सव मंडपात दाखल होते व सर्वत्र पावित्रयाचा सुगंध दरवळतो. श्रींच्या गणेशोत्सव मंडपासाठी प्रतिवर्षी भारतातील पवित्र मंदिरे, उत्तम कलाकृती, राजवाडे इ. आपण प्रतिकृती रूपाने नयनरम्य अशी रोषणाई करतो.

श्रींची प्राणप्रतिष्ठापना

सोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६,
श्रींची आगमन मिरवणुक वेळ :- सकाळी ८ .०० वा. मंदिरापासून
श्रींची प्राणप्रतिष्ठापना वेळ :- सकाळी ११.०१ वा.
परम पूज्य डॉ.श्री.बाबासाहेब तराणेकर महाराज (इंदूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे.

प्रतिवर्षी मुहूर्तानुसार धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानमुर्तीच्या हस्ते आपण प्राणप्रतिष्ठापना विधीपूर्वक करतो. प्राणप्रतिष्ठापनेची उत्सव मुर्ती ही वेगळी असते व त्याचेच नंतर विसर्जन केले जाते. या प्राणप्रतिष्ठापना सोहळयास ज्ञानवंत पुरोहित पौरूहित करतात.

श्रींची प्राणप्रतिष्ठापना प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_aagman_1
  दगडूशेठ गणपती प्राणप्रतिष्ठापना
 • Dagadusheth_Ganapati_aagman_2
  दगडूशेठ गणपती प्राणप्रतिष्ठापना
 • Dagadusheth_Ganapati_aagman_3
  दगडूशेठ गणपती प्राणप्रतिष्ठापना
 • Dagadusheth_Ganapati_aagman_4
  दगडूशेठ गणपती प्राणप्रतिष्ठापना

विद्युत रोषणाई

सोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६,
वेळ :- सायं. ७ .०० वा.
“महाबलीपुरम (चेन्नई) येथील शिव मंदिर” या मंदिरावर लावलेल्या मोतिया रंगाच्या लक्ष्य लक्ष्य दिव्यांच्या, नयनरम्य, नेत्रदिपक विद्युत रोषणाईचे उद्घाटन श्री.सतीशजी माथूर साहेब, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मंगलमूर्ती गणरायाच्या प्रतिवर्षी १० दिवस उत्सव हा महाराष्ट्रात संपन्न होतो. प्रतिवर्षी विलोभनीय, चित्ताकर्षक, मनमोहक आणि प्रबोधनात्मक देखावे, उभे केले जातात. भारतातील प्रसिध्द देवालये, राजप्रासाद पाहण्याचे भाग्य सर्वांच्याच नशीबात असेल असे नाही. अनेक अडचणींमुळे, अनेक कारणामुळे ईच्छा असूनही जाता येत नाही अशा भाविकांना इथल्या इथे दर्शन घडावे, या भावनेतून गेली चार दशके आपण भारतातील मदुरा-मिनाक्षी मंदिर, ओरिसातील सूर्यमंदिर, कोल्हापूरमधील श्री. महालक्ष्मी मंदिर, म्हैसुरचा राजवाडा, बिकानेरचा राजप्रासाद, अंगोला महल (राजस्थान), इंदौरचा शिशमहल अशी अनेकविविध कलात्मक शिल्पे उभी केली आहेत.देशाची एकता आणि अखंडताही यामधून साधण्याचा आणि राज्याराज्यातील बंधुप्रेम वृध्दींगत करण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, लोकजागृतीचे, लोकशिक्षणाचे, प्रबोधनात्मक देखावे हे या गणेशोत्सवाचे आगळे वेगळे वैशिष्टय आहे.

विद्युत रोषणाई प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Roshnai_01
  दगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई
 • Dagadusheth_Ganapati_Roshnai_02
  दगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई
 • Dagadusheth_Ganapati_Roshnai_03
  दगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई
 • Dagadusheth_Ganapati_Roshnai_04
  दगडूशेठ गणपती विद्युत रोषणाई

ऋषीपंचमी महाआरती

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६
वेळ :- पहाटे ६.०० वा.
महिला अथर्वशीर्ष पठण शंखनाद आणि बाप्पांची महामंगल आरती. प्रमुख अतिथी : श्रीमती रश्मीताई शुक्ला, पोलिस आयुक्त, पुणे, सौ.गिरीजाताई बापट, आमदार श्रीमती नीलमताई गोर्‍हे

गणेशोत्सवाचा ऋषीपंचमीचा दुसरा दिवस हा या उत्सवाचा मेरूमणी आहे. पहाटे ६ वाजता शहरातील महिला भगिनी महाराष्ट्राच्या पारंपारिक वेषात गणपतीच्या शिव मंदिरात विराजमान होणार आहेत. २५ हजार महिलांचा महासागर येथे दिसणार आहे. मंगलमूर्तीच्या सामुदायिक महाआरतीचा प्रारंभ शंख नादाने होणार आहे. अथर्वशीर्ष आवर्तनाने वातावरण पवित्र होणार आहे. गणपतीच्या नाम स्मरणाने भक्ती, प्रिती आणि श्रध्देचा भक्तीमळा फुलणार आहे. महिलांचा वाढता सहभाग ही या कार्यक्रमाची खासीयत आहे. गणपतीबाप्पाची कृपा मोठी आहे.

ऋषीपंचमी महाआरती प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Vrushipanchmi-3
  दगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती
 • Dagadusheth_Ganapati_Vrushipanchmi-1
  दगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती
 • Dagadusheth_Ganapati_Vrushipanchmi-2
  दगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती
 • Dagadusheth_Ganapati_Vrushipanchmi-4
  दगडूशेठ गणपती ऋषीपंचमी महाआरती

वारकरी गजर

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६,
वेळ :- रात्री १०.०० ते पहाटे ३ वाजेपर्यंत

सहभाग : महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधुंच्यावतीने श्रीगणराया समोर हरी जागर कार्यक्रम होणार आहे.

बाप्पांची विशेष संकल्प पुजा

बुधवार दि. ७ सप्टेंबर २१०६

बाप्पांच्या दर्शनासाठी आध्याित्मक गुरु श्री. श्री. रवीशंकरजी यांचे आगमन दुपारी १.१५

गणेश याग

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६
गणेशयाग शुभारंभ – सकाळी ९ .०० वा. शुभहस्ते, परमहंस योगीनी श्री वेणाभारती दीदी, नाशिक क्षेत्र. पौरोहित्य वेदमूर्ती श्री. मिलिंद राहुरकर आणि श्री. नटराज शास्त्री

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ :- रोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल.

प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये ऋषी पंचमीपासून म्हणजेच दुस-या दिवसापासून गणपती मंडपात पवित्र गणेशयागासाठी सर्व साहित्य, पुरोहित यांची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात येते. यागासाठी यजमान भाविक नोंदणी करतात, यागास सहकुट्रंब बसता येते. साधारण तीन ते साडेतीन तासाचा हा पवित्र धार्मिक विधी असतो व गणेशभक्तांची गणेशयाग करण्याची ईच्छा यातून पुर्ण होते. हे गणेशयाग आपण पाच दिवस करतो. वेदमुर्ती मिलिंद राहूरकर तसेच श्री. नटराज हे विधीपुर्वक गणेश याग पार पाडतात.

गणेश याग प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Ganeshyag_photo4
  दगडूशेठ गणपती गणेश याग
 • Dagadusheth_Ganapati_Ganeshyag_photo1
  दगडूशेठ गणपती गणेश याग
 • Dagadusheth_Ganapati_Ganeshyag_photo3
  दगडूशेठ गणपती गणेश याग
 • Dagadusheth_Ganapati_Ganeshyag_photo2
  दगडूशेठ गणपती गणेश याग

महाअभिषेक पूजा

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ :- रोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांसाठी.

श्रींच्या मंडपामध्ये दररोज पहाटे ५ वाजता श्रींच्या महापुजा सुरू होतात. श्री व सौ अशा जोडया या पुजेस बसतात. प्रत्यक्ष गणपती बाप्पास अभिषेक करतात. गणपती बाप्पा पुढे विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष व महापूजा असं अत्यंत पवित्र वातावरणात त्याठिकाणी असते. ब-याच मंदिरांमध्ये प्रत्यक्ष जोडीने बसून अभिषेक, महापूजा भाविकांना इच्छा असूनही करता येत नाही. तेथे नावाने अभिषेक केला जातो. परंतु आपल्या येथे प्रत्यक्ष जोडीने, सहकुटूंब श्रींच्या पवित्र मुर्तीवर विधीपुर्वक अभिषेक होतो. सर्व साहित्याची व्यवस्था ट्रस्ट करते. फक्त श्रींचा प्रसाद भाविकांस आणावयास सांगितला जातो. पुजा करून अनेक भाविक कृतघ्न होतात, धन्य होतात. त्यांच्या चेह-यावरील समाधान हेच आमच्या प्रेरणेचे बळ आहे.

महाअभिषेक पूजा प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Maha-Abhishek_01
  दगडूशेठ गणपती महाअभिषेक
 • Dagadusheth_Ganapati_Maha-Abhishek_02
  दगडूशेठ गणपती महाअभिषेक
 • Dagadusheth_Ganapati_Maha-Abhishek_04
  दगडूशेठ गणपती महाअभिषेक
 • Dagadusheth_Ganapati_Maha-Abhishek_03
  दगडूशेठ गणपती महाअभिषेक

महानैवेदयम प्रसाद

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ :- पहाटे ५.०० ते रात्री ८ .३० वाजेपर्यंत.

श्री गणेशांच्या पूजनानंतर आणि आरतीनंतर त्यांच्या चरणी महानैवेद्य अर्पण करणे हा आणखी एक आनंद-सोहळा असतो. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरातील महानैवेद्य ही तर एक नेत्रसुखद अशी पर्वणी असते. भक्तांनी गजाननाला भक्तिभावाने अर्पण केलेला नैवेद्य अतिशय कलात्मक रीतीने सजवून गणेशमूर्तीसमोर मांडला जातो आणि ती सजावट बघण्यासाठीही गणेशोत्सवाच्या काळात भक्तांची गर्दी लोटते. मोदकप्रिय अशा गजाननाच्या चरणी हजारो मोदकंचा आणि अन्य गोड मिठाईचा हा महानैवेद्य हेही भक्तिभावाचेच प्रतीक असते. सायंकाळच्या महामंगल, आरती नंतर हा प्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटला जातो.

महानैवेदयम प्रसाद प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Mahanaivedya-1
  दगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद
 • Dagadusheth_Ganapati_Mahanaivedya-3
  दगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद
 • Dagadusheth_Ganapati_Mahanaivedya-2
  दगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद
 • Dagadusheth_Ganapati_Mahanaivedya-4
  दगडूशेठ गणपती महानैवेदयम प्रसाद

श्रींची महामंगल आरती

दररोज रात्री ८.०० वाजता.

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशोत्सवाच्या काळात दररोज महाआरती केली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामवंत या आरतीत आवर्जून सहभागी होतात. श्री गजाननाची आरती करणे ही भक्तांसाठी आनंददायक घटना असते. तबकात प्रज्वलित केलेल्या निरांजनाच्या वातींचा प्रकाश, उदबत्तीचा दरवळ आणि फुलांचा सुगंध, टाळांचा ध्वनी आणि त्याला टाळ्यांची साथ अशा प्रसन्न वातावरणात समस्त भक्तांच्या समवेत म्हटली जाणारी गणरायाची आरती मन भारून टाकते. त्या सुखकर्त्या आणि विघ्नहर्त्या गणेशापाशी मन एकाग्र करून त्याच्या आरतीच्या सुरात सूर मिसळताना लहान-थोर असा भेद कोणाच्या मनात उरतच नाही. मंगलमूर्ती गजाननाच्या कृपेची याचना करणारे सारे भक्त या आरतीत सामिल होतात.

श्रींची मंगल आरती प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Maha-Arti_03
  दगडूशेठ गणपती मंगल आरती
 • Dagadusheth_Ganapati_Maha-Arti_02
  दगडूशेठ गणपती मंगल आरती
 • Dagadusheth_Ganapati_Maha-Arti_04
  दगडूशेठ गणपती मंगल आरती
 • Dagadusheth_Ganapati_Maha-Arti_01
  दगडूशेठ गणपती मंगल आरती

शालेय अथर्वशीर्ष पठण

मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत वेळ :- दररोज सकाळी पहाटे ५.०० ते ६.०० वाजता.

हरी नमस्ते गणपतये…….हे पवित्र स्वर गणेशोत्सवात प्रतिदिन पहाटे ५ वाजता श्रींच्या मंडपामध्ये आपल्या कानी पडतात. पुण्याच्या विविध शाळांमधील विद्यार्थी उत्सवामध्ये रोज पहाटे नियमितपणे अथर्वशीर्ष म्हणावयास मंडपात येतात, स्वेच्छेने येतात संपूर्ण वातावरण त्या मंगलमय सुरांनी न्हाऊन निघते. हे सर्व विद्यार्थी आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. ट्रस्टने या विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती, आपला देव, आपला धर्म रूजविण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांची ही फलश्रुती आहे.

शालेय अथर्वशीर्ष पठण प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Shaley_Athravsheersha1
  दगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण
 • Dagadusheth_Ganapati_Shaley_Athravsheersha3
  दगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण
 • Dagadusheth_Ganapati_Shaley_Athravsheersha-4
  दगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण
 • Dagadusheth_Ganapati_Shaley_Athravsheersha2
  दगडूशेठ गणपती शालेय अथर्वशीर्ष पठण

विसर्जन मिरवणूक

गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी श्रींची वैभवशाली विसर्जन मिरवणुक, नयनरम्य रोषणाईंने नटलेल्या भव्य, दिव्य, ‘श्री गणनायक रथातून‘ भाविकांच्या उपस्थितीत निघेल.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रींना मंडपातून श्रीमंदिराकडे मिरवणुकीने नेण्यात येते. सकाळी ६ वाजता श्रींची सर्व कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते मंगलआरती होते व रात्रीचे वेळी अत्यंत नयनरम्य, आकर्षक अशा रथामधून श्रींच्या विसर्जन मिरवणूकीस सुरूवात होते. अत्यंत शिस्तबध्द पाढ-यां रंगाच्या पारंपारीक पोशाखात सर्व कार्यकर्ते येतात, महिलांचासुध्दा सहभाग वाखाणण्याजोगा असतो. अत्यंत उत्साह व भक्तीचा मळा फुललेला असतो. श्रींच्या मंगलगीतांनी व घोषणांनी वातावरणात जल्लोष भरतो. पारंपारीक ढोल, ताशे, ठेका धरायला लागतात. भक्तीगीते व देशभक्तीपर गीतांनी आणि बॅडने लक्ष वेधून घेतात. मिरवणुकीत सर्वात पुढे मंगलमय सनई नगारा वाजत असतो. विविध शाळाची ध्वज पथके मिरवणूकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतात व हा अत्यंत पावित्र्याचा व मांगयाचा उत्सव त्याची सांगता ह्या मिरवणूकीने भावपूर्ण वातावरणात होत असते. लक्ष्मी रस्त्यावरून ही मिरवणूक जाते. जस जसा श्रींचा रथ पुढे जातो तसतसे सर्व रस्त्यावरील भाविक, बाजूच्या ईमारतीवरील भाविक नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतात व पावन होतात. खास दगडूशेठ गणपतीसाठी बाहेरगावाहून आलेले लोक त्याची वाट पाहत असतात व त्याच्या दर्शनाने धन्य होतात. लाकडीपूल, खंडूजीबाबा चौकातील नदीच्या घाटावर प्राणप्रतिष्ठापना केलेल्या श्रींच्या मुर्तीचे अथर्वशीर्ष व आरती करून विधीपूर्वक विसर्जन केले जाते व ”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष वातावरणात दुमदुमतो. अशाप्रकारे ह्या अत्यंत विलक्षण, सुंदर, अनुपम उत्सवाची सांगता होते.

विसर्जन मिरवणूक प्रतिमा गॅलरी

 • Dagadusheth_Ganapati_Visrajan_01
  दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक
 • Dagadusheth_Ganapati_Visrajan_03
  दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक
 • Dagadusheth_Ganapati_Visrajan_04
  दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक
 • Dagadusheth_Ganapati_Visrajan_02
  दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक