DG_HindKesari_Competition_2017_02 28 Apr

हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बाबूराव सणस मैदानावर भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात १८ एप्रिल रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सर्वात जुन्या व प्राचीन मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी ६:३० वाजता या मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व नगरसेवक हेमंत रासने यांच्या सोबत ट्रस्टमधील विश्वस्त मंडळी ही यावेळी उपस्थित होती.

Dagadusheth_AmbaMahotsav_01 28 Apr

आंबा महोत्सव २०१७ अक्षय तृतीया या सणाला हिंदू सणांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण दरवर्षी बाप्पांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी बाप्पांना आंब्यांची आरास करण्यात आली होती. आंब्यांनी सजवलेल्या मखरात विराजमान झालेल्या बाप्पांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या हापूस आंब्यांचे वाटप त्यानंतर […]

DG_HindKesari_GadhaPujan_2017_01 27 Apr

मल्ल स्पर्धकांच्या हस्ते बाप्पांची आरती हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या स्पर्धकांनी बाप्पांचे दर्शन घेऊन स्वहस्ते बाप्पांची आरती ही केली. यावेळी हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या चांदीच्या गदेचे ही पूजन करण्यात आले.

DG_HindKesari_Competition_2017_01 17 Apr

भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बाबूराव सणस मैदानावर भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात २७ ते ३० एप्रिल यादरम्यान पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर रंगणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भूमी पूजन सोहळा १७ एप्रिल रोजी पार पडला.

Dagadusheth_NICU_Album_2017_07 16 Apr

ससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचा उदघाटन सोहळा उत्साहात ससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या कामासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ने मदतीचा हात पुढे करून आपली सामाजिक बांधिलकी ही जपली. एन.आय.सि.यू विभाग हा नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग म्हणून भविष्यात कार्यरत असेल. या विभागाचे नूतनीकरण झाल्यानंतर त्याचे उदघाटन मा. श्री गिरीषजी बापट (पालकमंत्री) यांच्या […]

Dagadusheth_Mogara_Festival_Warkari_Post 15 Apr

वासंतिक उटी व मोगरा महोत्सव २०१७ प्रतिवर्षी वसंतऋतू मध्ये वासंतिक उटीची पुजा श्री’चरणी अर्पण केली जाते. चैत्र महिन्यामध्ये ग्रीष्माचा दाह शमविण्यासाठी श्रीं च्या चरणी चंदन उटी लेपनाची सेवा अर्पण करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रसन्नते करीता सुवासिक फुलांची सजावट करण्यात येते. विविध सुवासिक फुलांनी सजलेले गणपती बाप्पांचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी भाविक दरवर्षी यादरम्यान मंदिरात गर्दी […]

Gudi_Padwa_2 28 Mar

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महापौरांच्या हस्ते गुढी पूजन गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या शुभ दिवशी पुण्याच्या महापौर माननीय मुक्ता टिळक यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता गुढी पूजनाचा सोहळा पार पडला. याच दिवशी पहाटे ४ ते ६ या वेळात स्वराभिषेकाचा कार्यक्रम ही पार पडला. श्री रोहित वनकर यांनी बासरी वादन केले तर भूषण […]

Dagdusheth_Angarki_Sankashti_Chaturthi_InfoPost_02 14 Feb

अंगारकी संकष्टी चतुर्थी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मंदिरात दिवसभर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत होता. यानिमित्ताने श्रीनिवास भीमसेन जोशी आणि विराज जोशी यांनी भक्तिगीते सादर करून बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक केला. पहाटे ४ ते ६ यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.

Dagdusheth_Angarki_Sankashti_Chaturthi_InfoPost_02 14 Feb

अंगारकी संकष्टी चतुर्थी श्रीनिवास भीमसेन जोशी यांचा बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मंदिरात दिवसभर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत होता. यानिमित्ताने श्रीनिवास भीमसेन जोशी आणि विराज जोशी यांनी भक्तिगीते सादर करून बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक केला. पहाटे ४ ते ६ यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.