Dagdusheth_Ganpati_Nitin_Gadkari_125Year

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ ची आरती

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, माणिक चव्हाण यांसह विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी गडकरी यांनी ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेले ब्रह्मणस्पती मंदिर व त्यांची वैशिष्टे पाहून भरभरून कौतुक केले. तसेच गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. ट्रस्टतर्फे त्यांचे सन्मानचिन्ह व उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उत्सव मंडपात उपस्थित असलेल्या वारकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

Share
This