Dagdusheth_Ganpati_Aditya_Thakare_125Year

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे

यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ ची आरती

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या नीलम गो-हे, ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी ठाकरे यांनी ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेले ब्रह्मणस्पती मंदिर व त्यांची वैशिष्टे पाहून भरभरून कौतुक केले. तसेच गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. ट्रस्टतर्फे त्यांचे सन्मानचिन्ह व उपरणे देऊन स्वागत करण्यात आले.

Share
This