Dagdusheth_Ganpati_Swanand_Pund_Shastri_125Year

प. पू. गाणपत्य स्वानंदशास्त्री पुंड शास्त्री

पुराणातील कथांमध्ये दडलेला खरा अर्थ शोधा

प. पू. गाणपत्य स्वानंदशास्त्री पुंड शास्त्री : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम

पुणे: पुराणामध्ये सांगितलेल्या प्रत्येक कथांमध्ये एक वेगळा अर्थ दडलेला असतो. पुराणातील प्रत्येक कथांमधून काहीतरी उपदेश केलेला असतो. अध्यात्माच्या अंगाने या कथा समजून घेतल्या तर कथांचा खरा अर्थ समजेल, असे विचार प. पू. गाणपत्य स्वानंदशास्त्री पुंड यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुद््गल पुराणातील कथांचा खरा अर्थ याविषयी महत्त्व कथन केले.

स्वानंदशास्त्री पुंड म्हणाले, पुराणातील कथा समजून घ्यायची असेल तर त्या कथेला प्रश्न विचारा. या कथांचे खरे अर्थ जेव्हा कळतील तेव्हा मोरयाच्या उपासनेला अर्थ प्राप्त होईल. ज्या कथा आपण ऐकतो या कथांमधील प्रत्येक गोष्टींचा विचार करायला शिकले पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलेल्या कथांचा भाव समजला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, जगातील सगळी दु:ख मी आणि माझ या दोन शब्दांमुळे आहेत. त्यामुळे अहंकाराला कशाप्रकारे नाहिसे करायचे, याविषयीच्या कथा पुराणात सांगितल्या आहेत. त्यामुळे अहंकार, मनातील वाईट विचार घालविण्यासाठी कथांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

Share
This