Dagdusheth_Ganpati_ShastriyaGayan_Jugalbandii_125Year

शास्त्रीय गायन जुगलबंदी

स्वरमैफलीतून उलगडले शास्त्रीय संगीतातील विविध पैलू

पं. राजन-साजन मिश्रा यांची शास्त्रीय गानमैफल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : रागातील बंदिशींच्या माध्यमातून सुमधूर गायकीची आणि आलाप-तानांमधील अनोख्या जुगलबंदीची रसिकांनी अनुभूती घेतली. आपल्या कसदार गायकीतून पं. राजन-साजन मिश्रा यांनी सादर केलेल्या स्वरमैफलीतून रसिकांसमोर शास्त्रीय संगीतातील विविध पैलू रसिकांसमोर उलगडले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शास्त्रीय गायन जुगलबंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मैफलीची सुरुवात रामदासी-मल्हार या रागाने झाली. या रागातील विलंबित एकतालातील सकल बलहु लाए… मध्यलय तीनतालातील घन आये घनश्याम न आये… या बंदिशींनी रसिकांची मने जिंकली. हंसध्वनी रागातील श्री गणपती गजानन… या गणेश वंदनेने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले.

सूरांची देवी असलेल्या मातंगी मातेचे वर्णन असलेल्या जय जय जय मातंगी माता… या बंदिशीने रसिक मंत्रमुग्ध झाले. धन्य भाग सेवा का अवसर पाया… या भजनाने मैफलीची सांगता झाली. अरविंद थत्ते (हार्मोनिअम), अरविंदकुमार आझाद (तबला), निकीता दरेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

Share
This