Dagdusheth_Ganpati_Vishwas_Sakrikar_125Year

प. पू. विश्वास साक्रीकर

अध्यात्माचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार व्हावा

प. पू. विश्वास साक्रीकर यांचे मत; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त प्रवचन कार्यक्रम

पुणे: पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण तत्परतेने पाळतो, परंतु त्यामागील विज्ञान समजून घेत नाही. श्रद्धा ही आंधळी नसून डोळस असावी. आज आपल्या समाजातील लोकांनी धर्म आणि विज्ञान यामध्ये गल्लत केलेली दिसते. विज्ञानाची जोड न दिल्यामुळे आपण धर्माला पांगळे केले आहे. कोणतीही साधना करण्यापूर्वी त्यामागील ज्ञान समजून घ्या. अध्यात्माच्या प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, असे मत टिटवाळा गणपती देवस्थानचे प.पू. विश्वास साक्रीकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रवचनात त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गणपती, आध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टी याविषयी मार्गदर्शन केले.

विश्वास साक्रीकर म्हणाले ,भारतीयांसारखी बुद्धिमत्ता ही जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही. परंतु आपण अध्यात्मातील विज्ञान मान्य करायला तयार नाही. जोपर्यंत अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत विश्वाचे गूढ आपल्याला समजणार नाही. पूजा उपासनेत आज आपली तरुण पिढी वेळ घालवित आहे. परंतु अध्यात्मातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, शुद्ध ज्ञानाचा कारक म्हणजे मंगलमूर्ती आहे. मातीतून सृजनतेची प्रक्रिया सुरू होते म्हणून मातीचा गणपती तयार करतात. गणेशोत्सव म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे. ती ऊर्जा आपण उपासनेतून करायची असते. गणपतीचे विसर्जन करताना आपल्यातील वाईट विचारांचे विसर्जन देखील त्याबरोबर करायचे असतात. गणेशाची पूजा करताना त्यातील अध्यात्माबरोबर, वैज्ञानिक, भौतिकशास्त्र आणि शारीरिक शास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे.

Share
This