Dagdusheth_Ganpati_Lok_kala_125Year

लावणीच्या माध्यमातून अवतरला लोककलेचा कलाविष्कार

सुरेखा पुणेकर, सुरेखा कुडची, पूजा पाटील, माया खुटेगावकर आणि कलाकारांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव

पुणे : ढोलकीच्या तालावर… या रावजी बसा भाऊजी… चांदन चांदन झाली रात… अशा एकाहून एक सरस अशा लावण्यांच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय कलेची भुरळ घातली. हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभविला. सुरेखा पुणेकर, सुरेखा कुडची, पूजा पाटील आणि माया खुटेगावकर यांनी आपल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये लोककला कार्यक्रमांतर्गत लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

विचार काय हाय तुमचा… पैलवान आला हो पैलवान आला… बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा… ज्वानीच्या आगीची मशाल हाती… या लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. सुरेखा कुडची यांनी सादर केलेल्या कैरी पाडाची… या लावणीला रसिकांनी विशेष दाद दिली. वाजले की बारा…. अप्सरा आली… नटरंग उभा… या नटरंग चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा… या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून सुरेखा पुणेकर यांनी रसिकांची मने जिंकली. मी मेनका ऊर्वशी… आणि छत्तीस नखरेवाली… या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली.

Share
This