Palakhi_Sohala_Pushparushti_125Year

माऊलींच्या पालखीवर श्रीं च्या मंदिरासमोर पुष्पवृष्टी

पालख्यांवर मंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पवृष्टी

पुषवृष्टीचा डोळे दिपवणारा सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी

१८ जून सायंकाळी ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात पोचल्या. या पालख्यांवर मंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. गणपती बाप्पा आणि माऊलींच्या गजराने पमंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

ज्ञानोबा माऊली.. तुकाराम आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात माउलींच्या पालखीचे पुण्यात १८ जून २०१७ रोजी आगमन झाले. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरून जाताना पालख्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शेकडो वर्षाच्या परंपरा आजही या निमित्ताने मंदिर ट्रस्ट मार्फत जपल्या जातायत हे विशेष… !!

दोन्ही संस्थानाच्या विश्वस्तांनी यावेळी गणरायाचरणी नतमस्तक होऊन आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी साकडे घातले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ट्रस्ट मार्फत वारीच्या काळात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच उपस्थित वारकऱ्यांना हरित वारीसारख्या वेगळ्या व समाज उपयोगी कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मंदिर ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी , सुनील रासने यांसह वारकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित होती.

Share
This