Vrukshropan_Palakhi_Sohala_125Year_1

देहूनगरीतून हरित वारीचा “श्रीगणेशा”

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट ने पुढाकार घेत वारी मार्गावर वृक्षारोपण करून राज्यभर ५० लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निश्चय केला आहे. या वृक्षारोपणाचा पहिला टप्पा नुकताच १६ जून २०१७ रोजी देहूमध्ये पार पडला.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने इंद्रायणी नदीच्या तीरावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा पार पडला. यावेळी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प मारुती महाराज कुऱ्हेकर , देहू संस्थानचे माणिक महाराज मोरे , आळंदी संस्थानचे विलास महाराज बागल, देहूच्या सरपंच सुनीता टिळेकर, दगडूशेठ गाणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, वनराईचे रविंद्र धारिया यांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर ही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणातून वारकऱ्यांना वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी प्रेरित केले.
जय गणेश हरित वारी या उपक्रमात महाराष्ट्रातील अनेक जागरूक पर्यावरण संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share
This