Ashwa_Palkhi_Sohala-125Year_2

ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना

ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना

वारी इतिहासात प्रथमच ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांनी मंदिराच्या सभामंडपातून गणपती बाप्पांना मानवंदना दिली. हा सोहळा १५ जून रोजी मंदिर परिसरात पार पडला.

माऊली…माऊली आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने पुण्यात १५ जून २०१७ रोजी ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या अश्वांनी यावर्षी इतिहासात प्रथमच बाप्पांना मंदिराच्या सभामंडपात जाऊन मानवंदना दिली. यावेळी पुणेकरांनी अश्व पूजन करून विश्वकल्याणासाठी बाप्पांकडे व माऊलीकडे साकडे घातले. या संपूर्ण सोहळ्याचे फेसबुक लाईव्ह व्हिडीओ च्या माध्यमातून जगभर पसरलेल्या भक्तांसाठी मंदिराच्या ऑफिशियल फेसबुक पेज वरून प्रक्षेपण ही करण्यात आले.

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकारच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यात झाले होते. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटर चा प्रवास करून हे अश्व वारीला जातात. यादरम्यानच्या प्रवासात दरवर्षी ते बाप्पांचे दर्शन मंदिराबाहेरून घेतात मात्र यावर्षी प्रथमच मंदिराच्या सभामंडपात येऊन अश्वांनी बाप्पांचे दर्शन घेतले. बाप्पांचे दर्शन घेऊन अश्वांनी आळंदीकडे प्रस्थान केले.

या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे , कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, शितोळे सरकार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे माऊली महाराज कोकाटे , ह.भ.प बाळासाहेब वांजळे , ह.भ.प राजाभाऊ थोरात , तुकाराम कोळी यांसह वारकरी मंडळी उपस्थित होती. मंदिर परिसरात या अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

Share
This