Dagadusheth_Sankashti_Chaturthi_Album_02

जगभरात निनादले बीजमंत्र सूर

बीजमंत्रोच्चारण सोहळ्याचे आयोजन

१३ ते २७ जून २०१७ यादरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टतर्फे गणपती बीजमंत्रोच्चारण सोहळ्याचे आयोजन जगभरात करण्यात आले होते. घरबसल्या भक्तांनी या काळात बीजमंत्रोच्चाराचे पठण करत जपमाळांची संख्या नोंदवण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. जगभरातील हजारो भक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. या सोहळ्याची सांगता मंदिरात विशेष पद्धतीने करण्यात आली होती. २६ व २७ जून रोजी सलग ३६ तास मंदिरात हा सोहळा संपन्न झाला.

Share
This