Dagadusheth_Kabaddi_Album_Day3_01

राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन

जय गणेश चषकासाठी राज्यातील कबड्डी संघांमध्ये चुरस

राज्यातील पुरुष आणि महिलांचे विविध कबड्डी संघ जय गणेश चषक जिंकण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पहिल्यांदाच या स्पर्धेचा थरार फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना आणि कबड्डी प्रेमींना अनुभवता आला. पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर हे सर्व सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या एअर इंडिया संघाने बाजी मारत जय गणेश चषक जिंकला. त्यांना १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तर महिलांच्या गटात सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब, पुणे या संघाने बाजी मारत १ लाख ५१ हजाराचे पारितोषिक पटकावले.

Share
This