Dagadusheth_AmbaMahotsav_01

आंबा महोत्सव

आंबा महोत्सव २०१७

अक्षय तृतीया या सणाला हिंदू सणांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण दरवर्षी बाप्पांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी बाप्पांना आंब्यांची आरास करण्यात आली होती. आंब्यांनी सजवलेल्या मखरात विराजमान झालेल्या बाप्पांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या हापूस आंब्यांचे वाटप त्यानंतर ससून रुग्णालयात मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले. या दिवशी पहाटे ४ ते ६ बाप्पांच्या चरणी स्वराभिषेकाचा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. अनुराधा मराठे आणि अंजली मराठे यांनी यावेळी रसिकांना मंत्रमुग्ध केले. याच दिवशी सायंकाळी ९ वाजता अखिल भारतीय भजनी मंडळाचा कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात पार पडला.

Share
This