DG_HindKesari_Competition_2017_02

हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा पुणेकरांनी अनुभवला थरार

हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा पुणेकरांनी अनुभवला थरार

२०१७ च्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर करण्यात आलं होतं. २८ते ३०एप्रिल २०१७ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. प्रेक्षक म्हणून पुणेकरांनी मोठ्या संख्येत यावेळी मोठी गर्दी केली होती. पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून चित्रित करण्यात आला. हे थेट प्रक्षेपण जगभरातील हजारो लोकांनी पाहिले. हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा या वर्षीचा ‘किताब सुमित कुमार याने पटकावला. त्याला अडीच लाख रुपयांच्या पारितोषिकासॊबत चांदीची गदा देण्यात आली. अंतिम सामन्यात सुमित ने महाराष्ट्राच्या अभिजीत काटकेवर ९-२ अशी मात करत विजेतेपद पटकावले.

Share
This