Dagadusheth_NICU_Album_2017_07

एन.आय.सि.यू विभागाचा उदघाटन सोहळा

ससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचा उदघाटन सोहळा उत्साहात

ससून रुग्णालयातील एन.आय.सि.यू विभागाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या कामासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ने मदतीचा हात पुढे करून आपली सामाजिक बांधिलकी ही जपली. एन.आय.सि.यू विभाग हा नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग म्हणून भविष्यात कार्यरत असेल. या विभागाचे नूतनीकरण झाल्यानंतर त्याचे उदघाटन मा. श्री गिरीषजी बापट (पालकमंत्री) यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मा. श्री गिरीषजी महाजन , (वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री), मा. श्री दिलीपजी कांबळे , (सामाजिक न्याय राज्यमंत्री), मा. सौ. मुक्ताताई टिळक, (महापौर), मा. श्री अनिलजी शिरोळे , खासदार. यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share
This