Dagadusheth_Mogara_Festival_Warkari_Post

मोगरा महोत्सव २०१७

वासंतिक उटी व मोगरा महोत्सव २०१७

प्रतिवर्षी वसंतऋतू मध्ये वासंतिक उटीची पुजा श्री’चरणी अर्पण केली जाते. चैत्र महिन्यामध्ये ग्रीष्माचा दाह शमविण्यासाठी श्रीं च्या चरणी चंदन उटी लेपनाची सेवा अर्पण करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रसन्नते करीता सुवासिक फुलांची सजावट करण्यात येते. विविध सुवासिक फुलांनी सजलेले गणपती बाप्पांचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी भाविक दरवर्षी यादरम्यान मंदिरात गर्दी करताना सहज पाहायला मिळतात. शनिवार दि १५ एप्रिल २०१७ रोजी मंदिरात श्रींचा विविध सुवासिक फुलांनी विषेश महाअभिषेक करण्यात आला आणि मंगल आरती सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. या कार्यक्रमात सभागृह नेते श्री श्रीनाथ भिमाले व पुणे महानगरपालिका आयुक्त श्री कुणाल कुमार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्ताने १५ एप्रिल २०१७ रोजी रात्री ९ वाजता अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम ही पार पडला.

Share
This