दिनांक :- ९ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati दगडूशेठ गणपतीसमोर १५० ब्रह्मवृंदांनी केला मंत्रजागर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट्र; गणपती बाप्पासमोर मंत्रजागरातून वेदांची सेवा-
सार्वजनिक गणेशोत्सवात या पद्धतीचा मंत्रजागर फक्त दगडूशेठ गणपतीसमोर

पुणे : भारतीय वेदपरंपरेचा वारसा जपण्यासोबतच वेदांची सेवा करण्याकरीता दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पुणे आणि परिसरातील १५० ब्रह्मवृंदांनी मंत्रजागर केला. भाद्रपद शुद्ध एकादशीला झालेल्या मंत्रजागराने उत्सवकाळातील मंडपात होणा-या यज्ञविधींची सांगता झाली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यातील एकएक संहिता, पदांचे मंत्र आणि घन मंत्र याचे पठण झाल्याने वातावरणात वेगळी उर्जा निर्माण झाली होती. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती सूत्राने मंत्रजागराचा प्रारंभ झाला. या मंत्रजागरात काही कृष्ण यजुर्वेदीही सहभागी झाले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात मंत्रजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रजागराचे संयोजक मिलींद राहुरकर गुरुजी व ब्रह्मवृंद उपस्थित होता. सार्वजनिक गणेशोत्सवात या पद्धतीचा मंत्रजागर फक्त दगडूशेठ गणपतीसमोर होतो, हे याचे वैशिष्ट्य आहे.

याशिवाय केरळमधील नादब्रह्म कलावेधी संस्थेच्या वतीने केरळच्या पारंपरिक पूजेच्या कलावादनातील आसुर वाद्याचे वादन करण्यात आले. या वादनामध्ये चेंडा झेलम आणि पंजारी या दोन कला वादनाचे प्रकार सादर करण्यात आले. गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुनील तटकरे, भाजपाच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. महाराष्ट्रामध्ये सुख शांती नांदू दे, दुष्काळ संपू दे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना मान्यवरांनी यावेळी केली.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात मंत्रजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे व परिसरातील १५० ब्रह्मवृंदांनी मंत्रजागरामध्ये सहभाग घेतला. उत्सवात गणरायाला फळांचा भोग चढविण्यात आला होता. यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आरती केली.

I014
I013
I012
I011
I010
I009
I008
I007
I006
I005
I004
I003
I002
I001