दिनांक :- ७ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati चांद्रयान २ मोहिम यशस्वी करुन भारतीय चंद्रावर पाऊल ठेवतील-
डीआरडीओ चे डायरेक्टर जनरल प्रविण मेहता यांचा विश्वास; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाचे दर्शन

पुणे : चांद्रयान मोहिमेसारखे काम जेव्हा आम्ही करतो, तेव्हा ते पूर्ण होवो किंवा न होवो त्यातून मिळणा-या शिकवणीतून ते काम पुढे नेले जाते. जेव्हा चांद्रयान २.१ किमी अलिकडे होते, तेव्हा पृथ्वीशी म्हणजेच आपल्याशी संपर्क तुटला. मात्र, संपर्क कोठे तुटला, कसा तुटला याचा अभ्यास करुन आपले शास्त्रज्ञ येणा-या काळात हे काम पूर्ण करण्यासोबतच भारतीय आपले पाऊल चंद्रावर ठेवतील, अशा विश्वास डीआरडीओ चे डायरेक्टर जनरल प्रविण मेहता यांनी व्यक्त केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात प्रविण मेहता यांनी सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, प्रविण मेहता यांच्या पत्नी मधु मेहता उपस्थित होते. यावेळी मेहता यांच्या हस्ते गणरायाला अभिषेक देखील करण्यात आला. तसेच चांद्रयान २ मोहिम हाती घेऊन भारताने आत्तापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल गणरायाला तिरंगी हार अर्पण करुन पुढील मोहिमेच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रार्थना केली.

प्रविण मेहता म्हणाले, पहिल्यांदा हा प्रयत्न करण्यात आला की दक्षिण ध्रुव दिशेला यान जाईल. आजपर्यंत त्या भागाचे प्रक्षेपण करण्यात आलेले नाही. तेथे हिलीयम ३ मिळण्याची शक्यता होती. ते जर मिळाले, तर संपूर्ण पृथ्वीवर पुढील ५०० वर्ष पुरेल इतकी उर्जा मिळणे शक्य होईल. भारत चंद्राजवळ पोहोचल्याचा आनंद म्हणून आम्ही तिरंगी हार गणेशाला अर्पण करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात डीआरडीओ चे डायरेक्टर जनरल प्रविण मेहता यांनी सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. चांद्रयान २ मोहिम हाती घेऊन भारताने आत्तापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल गणरायाला तिरंगी हार अर्पण करण्यात आला.

C11
C10
C09
C08
C07
C06
C05
C04
C03
C02
C01