दिनांक :- ७ जुलै २०१९

dagdusheth ganapati संवाद माध्यमांविषयी ‘दगडूशेठ’ तर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कार्यक्रम; जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बोलके करणे, चर्चेमध्ये सहभाग कसा घ्यावा व वेगवेगळ्या विषयावर चर्चा कशा करायच्या, त्यासाठी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश पालकत्त्व योजनेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संवाद, माध्यम आणि विवेक याविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच त्याची सकारात्मक व नकारात्मक बाजू सांगताना विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांसोबत मुक्त चर्चा देखील केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी दगडूशेठ गणपती मंदिराच्या मागील गणपती सदन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, सोशल मीडिया तज्ज्ञ साकेत बापट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, ज्ञान, माहिती, संशोधन व मनोरंजन या चार गोष्टी संवाद माध्यमामुळे मिळतात. संवाद माध्यमे वापरताना आज आपल्याला सकारात्मक उपयोग होतो आहे. मात्र, ते आपल्यावर नकारात्मक परिणाम देखील घडवितात का?, याचा विचार करीत माध्यमे वापरताना स्वत:वर नियंत्रण घातले पाहिजे. संवाद माध्यमातून नकारात्मकता जास्त प्रमाणात पसरविली जात आहे. चांगल्या बाजूंना तेवढी प्रसिद्धी मिळत नाही.

साकेत बापट म्हणाले, संवाद माध्यमांचा उपयोग स्वत:च्या विकासासाठी करायला हवा. जगातील कोणतीही माहिती आपण संवाद माध्यमांच्या माध्यमातून घरी उपलब्ध करुन घेऊ शकतो. ही माहिती घेताना स्वत:वर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक काम आहे. चुकीच्या गोष्टी पसरविणे हा संवाद माध्यमाचा दोष नसून व्यक्तींचा दोष आहे.

संवादामध्ये आपण केवळ वाहक बनू नये, तर सध्या संवाद माध्यमातून जास्तीत जास्त वाहक बनल्याने चुकीची माहिती समाजात संक्रमित केली जात आहे, यावर मुलांनी चर्चा केली. संवाद माध्यमामधून आम्हाला नवीन माहिती मिळविण्यासाठी उपयोग होतो. संवाद माध्यमातून काही गोष्टी संग्रह करता आल्याने आवश्यक तेव्हा वापरता येतात, असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी दगडूशेठ गणपती मंदिराच्या मागील गणपती सदन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, सोशल मीडिया तज्ज्ञ साकेत बापट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

A L Deshmukh
A L Deshmukh01
A L Deshmukh03
A L Deshmukh02