दिनांक :- ६ ऑक्टोबर २०१९

dagdusheth ganapati दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या संस्कारवर्गातील मुलींचा महाभोंडला-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन; तब्बल ३०० हून अधिक मुली व महिलांचा सहभाग

पुणे : भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांचे ज्ञान आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या संस्कारवर्गाचा महाभोंडला मोठया उत्साहात पार पडला. संस्कारवर्गासह जय गणेश पालकत्त्व योजनेतील तब्बल ३०० विद्यार्थीनींसह त्यांच्या पालकांनी पारंपरिक वेशात या भोंडल्यात मोठया संख्येने सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या संस्कार वर्गातील सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. महाभोंडल्याचे यंदा ९ वे वर्ष होते. यावेळी जय गणेश पालकत्त्व योजनेत मुलांना मार्गदर्शन करणा-या शुभांगी भालेराव, मनिषा फणसळकर, स्वाती पंडित, स्वाती नखाते, मानसी जठार यांसह पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

ट्रस्टतर्फे चालविल्या जाणा-या संस्कार वर्गात इयत्ता २ री ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. ते देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. महाभोंडल्यासोबतच जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील मुलांसाठी विविध उपक्रम देखील राबविले गेले. कार्यक्रमानंतर भोंडल्याची खिरापत उपस्थितांना देण्यात आली. तसेच भोंडल्यासाख्या सणांचे महत्त्व देखील सांगण्यात आले.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात ट्रस्टच्या संस्कारवर्गातील मुली व त्यांच्या पालकांसाठी महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ३०० हून अधिक मुली व महिला उपस्थित होत्या.

B09
B08
B07
B06
B05
B04
B03
B02
B01