दिनांक :- ४ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati तब्बल ११ हजार सूर्यनमस्कारांतून विद्यार्थ्यांनी ‘दगडूशेठ’ ला केले वंदन-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; लक्ष्मी वेंकटेश चॅरिटेबल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टचा पुढाकार

पुणे : ओम् सूर्याय नम:… ओम् भास्कराय नम:… च्या मंगल स्वरांनी दगडूशेठ गणपती विराजमान असलेले श्री गणेश सूर्यमंदिर दुमदुमून गेले. मंत्रोच्चारांसोबत ३०० शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल ११ हजार सूर्यनमस्कार घालून गणरायाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वंदन केले. स्वच्छ मनासोबतच सुदृढ शरीरसंपदेकरीता बाप्पाने आम्हाला आर्शिवाद द्यावा, ही अशी प्रार्थना यावेळी विद्यार्थ्यांनी गणरायाकडे केली. पहाटे ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला वरुणराजाने देखील हजेरी लावली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात लक्ष्मी वेंकटेश चॅरिटेबल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्ट व इन्स्टिट्यूट आॅफ योगाच्या पुढाकाराने विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी ट्रस्टचे बाळासाहेब सातपुते, योगाचार्य प्रा.विदुला शेंडे, संस्थेचे अध्यक्ष विश्वास शेंडे, गोविंद गाडगीळ, सविता केळकर, विराज शेंडे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे हे ८ वे वर्ष आहे.

विश्वास शेंडे म्हणाले, शारीरिक क्षमता वाढविणे हे सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कारणांमुळे असलेले मनोविकार आणि शारीरिक विकार यावर सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय आहे. शारिरीक व्याधींतून जर विद्यार्थ्यांना मुक्तता मिळाली, तर उद्याच्या भारताचे भविष्य खूपच सुंदर असेल, असेही त्यांनी सांगितले.

समर्थ विद्यालय, विद्या विकास विद्यालय, ज्ञानांकूर इंग्लिश स्कूल, गोळवलकर गुरुजी विद्यालय, जे.एन.पेटीट स्कूल, डी.ई.एस. स्कूल, ए.नि.एम.एस. विद्या निकेतन, रेड क्रॉस मूकबधिर, विद्यावर्धिनी, सी.आर.रंगनाथन, अयोध्या मूक बधिक, विश्वकर्मा विद्यालय, लकुलिश योग युनिव्हर्सिटी बडोदा आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा.विदुला शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात लक्ष्मी वेंकटेश चॅरिटेबल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि इन्स्टिट्यूट आॅफ योगाच्या पुढाकाराने मंत्रोच्चारांसोबत ३०० शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल ११ हजार सूर्यनमस्कार घालून गणरायाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वंदन केले.

S005
S010
S009
S008
S07
S006
S003
S002
S001