दिनांक :- ४ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati मराठवाडयात दुष्काळ पडू देऊ नको
शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रार्थना; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाचे दर्शन – दिवसभरात अनेक दिग्गजांनी घेतले गणरायाचे दर्शन

पुणे : मुंबई-पुण्यात पाऊस आहे, मात्र आमच्या मराठवाडयात पाऊस नाही. पिण्याच्या पाण्याचे तलाव व नद्या कोरडया आहेत. मुंबईत पाऊस पडून आता उपयोग नाही. मराठवाडयात दुष्काळ पडू देऊ नको. मराठवाडयातील जनता, शेतकरी सुखी-समाधानी राहू दे. त्यांची प्रगती होऊन उन्नती होऊ देत, अशी प्रार्थना शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी श्रीं चरणी केली. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकून शिवसेनेचे राज्य येवो, असे साकडेही त्यांनी घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात चंद्रकांत खैरे यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय दिवसभरात अनेक दिग्गजांनी गणरायाचे दर्शन घेतले.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने गणरायाचे दर्शन घेतले. तसेच कोल्हापूर संस्थानचे मालोजीराजे यांनी गणरायाचे दर्शन घेतले. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. यातून ज्या लोकांचे नुकसान झाले, विशेष करून शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक आणि नागरिकांना या संकटातून सावरुन त्यांना धीर मिळावा, ही प्रार्थना त्यांनी गणपतीच्या चरणी केली. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गणरायाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी उपस्थित मान्यवर व विश्वस्त.

IMG-20190904-WA0008
IMG-20190904-WA0007
IMG-20190904-WA0005