दिनांक :- ३१ जुलै २०१८

dagdusheth ganapati
गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपतीची महाआरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांचा सहभाग

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गणपतीची महाआरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशभक्तांनी गणरायाला नमन केले. खग्रास चंद्रग्रहण असल्याने वेधकाळात अनेक भाविकांनी मंदिरात जप करीत गणरायाचरणी सेवा अर्पण केली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, उल्हास भट, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, राजेश सांकला यांसह ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, चंद्रग्रहणामुळे दुपारनंतर मंदिरातील धार्मिक विधी, अभिषेक आदी बंद करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. वेधकाळात भाविकांनी गणरायाचे दर्शन घेण्यासोबतच जप करण्याकरीता मोठी गर्दी केली होती, असेही त्यांनी सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गणपतीची महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित विश्वस्त व कार्यकर्ते.