दिनांक :- ३१ ऑक्टोबर २०१९

dagdusheth ganapati विनायकी चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज गणेशजन्मोत्सव उत्साहात साजरा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ; स्वराभिषेक आणि गणेशयागाचे आयोजन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने विनायकी चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज गणेशजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. भगवान श्री गणेशाच्या विविध अवतारांपैकी अत्यंत वैभवशाली अवतार असलेल्या श्री उमांगमलज अवताराचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पांना नारळाची सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाईने गणेशभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

विनायकी चतुर्थीनिमित्त स्वराभिषेक, गणेशयाग यांसह धार्मिक विधी संपन्न झाले. पहाटे ४ ते ६ या वेळेत गायिका मंजिरी आलेगावकर यांची गायनसेवा गणपती मंदिरामध्ये झाली. तसेच सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग संपन्न झाला. पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते. मंदिरावरील नारळाची प्रतिकृती पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

अशोक गोडसे म्हणाले, भगवान श्री गणेशाच्या विविध अवतारांपैकी अत्यंत वैभवशाली अवतार म्हणजे श्री उमांगमलज अवतार. या अवताराचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला संपन्न केला जातो. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला, त्याला जिवंत केले. यामुळे श्री गणेशांचे नाव आहे उमांगमलज. उमा म्हणजे देवी पार्वती. तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला . असा याचा शब्दश: अर्थ असला तरी बुद्धीवरील मळ झटकून त्या शुद्ध बुद्धीला श्री गजानन चरणी नतमस्तक करण्याचा उत्सव आहे.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने विनायकी चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज गणेशजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाप्पांना करण्यात आलेली नारळाची सजावट.

V3
V1
V6
V5
V4
V2
V7