दिनांक :- ३० जुलै २०१८

dagdusheth ganapati
ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचे बुधवारपासून हरिपाठावर निरुपण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ;
अंगारकी चतुर्थीला स्वराभिषेकाचे आयोजन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन दिनांक १ ते ३० आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. यावर्षी बाबामहाराज सातारकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर निरुपण करणार आहेत. ट्रस्टतर्फे गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते.

यापूर्वी ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव अशा अनेक संतांच्या कथांवर व अभंगांवर निरुपण केले आहे. प्रवचनासह कीर्तन व अभंगांतून संतांचे विचार पुणेकरांसमोर उलगडावे, याकरीता हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. महिनाभर सुरु राहणा-या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
* अंगारकी चतुर्थीनिमित्त स्वराभिषेकाचे आयोजन
ट्रस्टच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवार, दि. ३१ जुलै रोजी पहाटे ४ ते ६ या वेळेत गणपती मंदिरामध्ये होणार आहे. यावेळी मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच अभिषेक, याग यांसह विविध धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडणार आहेत. भाविकांसाठी मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

फोटो ओळ : ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचे बुधवारपासून हरिपाठावर निरुपण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ;अंगारकी चतुर्थीला स्वराभिषेकाचे आयोजन


[/vc_row_inner]