दिनांक :- २ जानेवारी २०२०

dagdusheth ganapati दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे विमा योजनेतून कर्मचा-याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे

पुणे : कात्रज भागात सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आलेल्या पुरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे क्लार्क पदावर असलेले सूरज वाडकर यांचे निधन झाले होते. ट्रस्टतर्फे न्यू इंडिया इश्युरन्स कंपनीमार्फत ट्रस्टच्या कर्मचा-यांचा विमा उतरविण्यात येतो. योजनेतून कै. सूरज वाडकर यांच्या कुटुंबियांना ट्रस्टतर्फे मदत देण्यात आली.

या योजनेतून कै. सूरज वाडकर यांच्या विम्याच्या रकमेचा दोन लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्त केला. मंदिरामध्ये सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माऊली रासने व कर्मचारी उपस्थित होते.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टतर्फे ट्रस्टचे क्लार्क पदावर असलेले कै. सूरज वाडकर यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश देताना ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माऊली रासने व इतर.

Dagdusheth Ganpati Help Photo