दिनांक :- २८ जानेवारी २०२०

dagdusheth ganapati दगडूशेठ मंदिरात गणेशस्तुतीच्या मंगल स्वरांत गणेशजन्म सोहळा-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन ; मंदिरामध्ये अलोट गर्दी

पुणे : माघ चतुर्थीला गं रम्य सोहळा… पार्वतीच्या उदरी गणेश जन्मला… च्या मंगल स्वरांत पाळणा म्हणत महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. लडीवाळा सुंदर राजस बाळ, बाळा जो जो रे… च्या निनादाने पवित्र झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला. मंदिरावर केलेली विविधरंगी फुलांची, आकर्षक झुंबरांची आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृध्दी नांदू दे अशी प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनिषा फणसळकर, चित्रा पुणतांबेकर, स्वाती पंडित, विद्या अंबर्डेकर, सीमा लिमये यांनी बीजमंत्र, गणपतीचा गजर, अथर्वशिर्ष म्हटले. गणेश भक्तांनी ३५१ किलो राजगिरा मोदक बाप्पाचरणी अर्पण केला.

मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांनी श्रींच्या चरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तीगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्यानंतर सकाळी ८ ते ११ यावेळेत गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. यामध्ये भक्तांनी सहकुटुंब सहभाग घेतला.

सायंकाळी ६ वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी झाले होते. दगडूशेठ गणपती मंदिरापासून – लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर – रामेश्वर चौक – टिळक पुतळा मंडई – कोतवाल चावडी – बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक – नू.म.वि. प्रशाला – अप्पा बळवंत चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

गणेशजन्म उत्सवात मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांनी अथर्वशीर्ष पठणाचे महत्व सांगितले. त्या म्हणाल्या, अथर्वशीर्ष पठणामुळे आपली वाचाशुध्दी होते. अथर्वशीर्षातील गं आणि ओम चा उच्चार केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाब, ह्रदयविकार दूर होतो. अथर्वशीर्ष पठणाने माणसाला मानसिक स्थैर्य, शांतता लाभते. पठणामुळे समाज सुसंस्कारी होतो. म्हणूनच अथर्वशीर्षाचे पठण हे केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नाही. अथर्वशीर्ष पठण हे समाजाच्या, देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी अथर्वशीर्षावर निरुपण केले. तसेच ओंकार प्रधान रुप गणेशाचे… जय जय हे ओंकारा… अशा गणेशगीतांचे देखील सादरीकरण केले. त्यांना मोहन पारसनीस (तबला), अमोद कुलकर्णी (हार्मोनियम) आणि रोहन करंदीकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक सजावट व बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी केलेली अलोट गर्दी. अथर्वशीर्षाचे महत्व सांगत सादरीकरण करताना मुक्ता गरसोळे-कुलकर्णी.

G02
G03
G08
G07
G09
G11
G14
G13
G15
Mukta Garsole 02
Mukta Garsole 01
Mukta Garsole 03
G12