दिनांक :- २६ जून २०१९

dagdusheth ganapati माऊली-तुकोबांच्या पालखीवर दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; दोन्ही संस्थांनच्या विश्वस्तांसह हजारो वारक-यांचे केले गणरायाला नमन

पुणे : माऊली…माऊली च्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माऊली…माऊली च्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दोन्ही संस्थांनच्या विश्वस्तांसह वारक-यांनी आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी गणरायाकडे साकडे घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पालख्यांसह दोन्ही संस्थांनच्या विश्वस्तांचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती. यावेळी वारक-यांना प्रसाद वाटप देखील करण्यात आले.

वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून रुग्णवाहिका, वारकरी भोजन, स्वच्छता आणि वारक-यांकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दोन्ही संस्थांनच्या विश्वस्तांचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी पुष्पवृष्टी करताना कार्यकर्ते.

DSC_0201
DSC_0194