दिनांक :- २६ जानेवारी २०२०

dagdusheth ganapati प्रजासत्ताकदिनी दगडूशेठ तर्फे रंगावलीतून उलगडली तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारी भव्य ३५ बाय ३५ फूट आकारात रंगावली साकारण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने पुणेकरांना शौर्याचा संदेश देणारी ही रंगावली पाहण्याकरीता नागरिकांनी मोठी गर्दी केली.

गड आला पण सिंह गेला… हे वाक्य सार्थकी करणा-या तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याकरीता केलेले पराक्रमांची पराकाष्ठा रंगावलीतून सांगण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याप्रती असलेली तानाजींची निष्ठा देखील पुणेकरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला. सोमनाथ भोंगळे व सहका-यांनी ही रंगावली आठ तासांत साकारली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ध्वजवंदनाकरीता मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त निरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारी भव्य ३५ बाय ३५ फूट आकारात रंगावली साकारण्यात आली.

Dagdusheth 26 Dec