दिनांक :- २२ सप्टेंबर २०१८

dagdusheth ganapati
प्रमुख देवस्थाने एकत्र करुन सामाजिक काम करणार
शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाचे सपत्नीक दर्शन

पुणे : जगभरात प्रसिद्ध असा पुण्याचा गणेशोत्सव आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येण्याचा आनंद वेगळा आहे. शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने सर्व कलाकार दर्शनासाठी आले असून हा आनंदाचा उत्सव आहे. आम्ही प्रमुख देवस्थांशी चर्चा केली असून सिद्धधीविनायकाच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत की सर्वांनी एकत्र येऊया. वारी मार्ग असेल, रुग्णांचा विषय असेल, याविषयी काय करता येईल हा संकल्प करुया. त्यामुळे पुढील काही दिवसात प्रमुख देवस्थाने एकत्र करुन काम करण्याचा मनोदय आहे. गणरायाने आमच्याकडून ही सेवा करुन घ्यावी, अशी प्रार्थना शिवसेनेचे सचिव (राज्यमंत्री) व श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी गणरायाचरणी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात आदेश बांदेकर यांसह सुचित्रा बांदेकर यांनी देखील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, उल्हास भट, मंगेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवसभरात विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी श्रीं चे दर्शन घेतले. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल, शिक्षणतज्ज्ञ डॉ.पी.डी.पाटील, सद््गुरु डॉ.सुनील काळे, प्रख्यात गायिका शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार कुलकर्णी, अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, सौरभ गोखले, कलाकार आयुषमान खुराना, नीना गुप्ता, नृत्य गुरु शमा भाटे, मनिष्या साठे व नृत्यकलाकार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच ट्रस्टचे विश्वस्त माणिक चव्हाण यांनी सपत्नीक अभिषेक केला. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांनी गणरायाचे दर्शन घेत आरती केली.