दिनांक :- २२ डिसेंबर २०१९

dagdusheth ganapati संस्कारांसोबत शारिरीक शिक्षणही गरजेचे-
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पुणे : संस्कारवर्गांच्या माध्यमातून चांगली पिढी घडविण्याचे काम होते. सध्याच्या पिढीच्या हातामध्ये अनेक आधुनिक उपकरणे आहेत. आधुनिक उपकरणांचे फायद्यांप्रमाणे तोटे देखील आहेत. इलेक्ट्रॉनिक खेळांमध्ये सध्याची पिढी रमताना दिसते. त्यामुळे त्यांना त्यापासून दूर करीत चांगल्या संस्कारांसोबतच शारिरीक शिक्षणही देणे गरजेचे आहे, असे मत पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष व दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेमध्ये करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, अरुण भालेराव, विजय चव्हाण, विनोद परदेशी, माऊली रासने, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. स्वाती पंडित, मनिषा फणसळकर, स्वाती नखाते, मानसी जठार या संस्कारवर्गाचे काम पहात आहेत.

हेमंत रासने म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे सन २०१० साली संस्कारवर्गाच्या उपक्रमाला प्रारंभ झाला. तेव्हापासून आजपर्यंत डिसेंबर महिन्यात मुलांसाठी स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, पहिल्यांदाच या ५५० विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टने स्थापन केलेल्या सुवर्णयुग स्पोटर्स क्लबच्या माध्यमातून देखील अनेक राष्ट्रीय खेळाडू देखील तयार झाले आहेत.

अरुण भालेराव म्हणाले, कै.तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारांतून ही संस्कार वर्गाची संकल्पना पुढे आली. तळागाळातील मुलांना पुढे आणून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जात आहे. खेळातून सांघिक भावनेसोबतच वैयक्तिक विकास देखील होतो, त्यामुळे यंदाचा क्रीडा स्पर्धांचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेमध्ये करण्यात आले. यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या हस्ते हेमंत रासने यांचा सन्मान करण्यात आला. तसेच खेळांमध्ये सहभागी योजनेतील विद्यार्थी व मान्यवर.

P08
P07
P06
P05
P04
P03
P02
P01