दिनांक :- १७ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशयाग आणि स्वराभिषेक-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट; भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून अलोट गर्दी

पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…ओम् गं गणपतये नम :… अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायक अमोल पटवर्धन यांनी गायनसेवा दिली. त्यानंतर गणेशयाग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली. अगदी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या अलिकडेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेशचरणी अमोल पटवर्धन व सहका-यांनी भावगीते आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून केलेल्या स्वराभिषेकाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी झालेली भाविकांची अलोट गर्दी.

×¢17
×¢16
×¢15
×¢14
×¢13
×¢12
×¢11
×¢10
×¢09
×¢08
×¢07
×¢04
×¢05
×¢06
×¢03
×¢02
×¢01