दिनांक :- १७ जुलै २०१९

dagdusheth ganapati ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचे शनिवार (दि. २०) पासून हरिपाठावर निरुपण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; पुणेकरांना विनामूल्य प्रवेश

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन दिनांक २० जुलै ते १९ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. यावर्षी बाबामहाराज सातारकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर निरुपण करणार आहेत.

ट्रस्टतर्फे गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. यापूर्वी ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी श्रीकृष्ण, श्रीराम, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, अशा अनेक संतांच्या कथांवर व अभंगांवर निरुपण केले आहे. प्रवचनासह कीर्तन व अभंगांतून संतांचे विचार पुणेकरांसमोर उलगडावे, याकरीता हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. महिनाभर सुरु राहणा-या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
तरी कृपया वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी. तसेच कार्यक्रमाला आपला बातमीदार व छायाचित्रकार पाठवावा, ही नम्र विनंती.

C8
C7
Dagdusheth Ganpati