दिनांक :- १६ ऑगस्ट २०१९

dagdusheth ganapati नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळ राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा निकाल जाहीर

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने एकूण १२ लाख ६ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, नगरसेवक हेमंत रासने, राजाभाऊ सूर्यवंशी, कुमार वांबुरे, दत्तोपंत केदारी, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दिनांक २० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या प्लॅस्टिक प्रदूषणाचा धोका, अणू युद्धापेक्षा मोठा या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या शिवबांच्या अदालतीतील दूध भेसळखोर या देखाव्यास ४५ हजारांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या १९७१ ची युद्धभूमी या देखाव्याला ४० हजारांचे, वीर शिवराय मित्र मंडळाच्या वाहतूक समस्या पुण्याची व जगाची या देखाव्याला ३५ हजारांचे आणि संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या टाकाऊ संगणकीय कच-यापासून श्री मूर्ती या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

अशोक गोडसे म्हणाले, ट्रस्टचे यंदा १२७ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांत सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती www.dagdushethganpati.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच भाविकांनी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, पराग ठाकूर, अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, गजानन सोनावणे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले.

* पूरग्रस्तांना दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे १० कोटी रुपयांची मदत
कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात उद््भविलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच देवस्थाने व मंडळांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट देखील त्या भागातील एका गावाची संपूर्ण उभारण्याकरीता करण्याकरीता पुढाकार घेत आहे. सध्या सुरु असलेली शासनाची मदत व पूरस्थिती निवळल्यानंतर आवश्यकतेनुसार टप्याटप्याने मदत कार्य सुरु केले जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात ट्रस्टचे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने हे असून १० कोटी रुपयांची मदत ट्रस्टतर्फे देण्यात येणार आहे. गावातील सर्व घरे, मंदिरे, शाळा आणि मशिद देखील ट्रस्टने दिलेल्या निधीतून आवश्यकतेनुसार टप्याटप्याने उभारण्यात येईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी जाहीर केले.

* इतर निकाल :-

१) पश्चिम विभाग :- संयुक्त आझाद मित्र मंडळ (प्रथम), विनायक नवयुग मित्र मंडळ (द्वितीय), आझाद मित्र मंडळ (तृतीय), गोखले स्मारक चौक तरुण मंडळ व संगम तरुण मंडळ (उत्तेजनार्थ). सोसायटी गणेशोत्सव – झाला सोसायटी त्रिदल गणेश मंडळ ट्रस्ट (प्रथम), सदाशिव स.गृ.संस्था मर्यादित (द्वितीय), श्री गणेश मित्र मंडळ (तृतीय). सांस्कृतिक देखावे – श्री जल्लोष सांस्कृतिक मंडळ (प्रथम), श्रीमंत बालकुमार गणपती ट्रस्ट (द्वितीय). काल्पनिक देखावे – श्रीकृष्ण मंडळ. सजीव देखावे – एकी तरुण मंडळ (प्रथम), ज्ञानेश्वर तरुण मंडळ (द्वितीय), अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (तृतीय). धार्मिक व पौराणिक देखावे – जय बजरंग तरुण मित्र मंडळ (प्रथम), संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ (द्वितीय). सामाजिक कार्य (बक्षिसपात्र) – सुयोग मित्र मंडळ.

२) पूर्व विभाग :- पौराणिक देखावे (बक्षिसपात्र) – पंडित नेहरु मित्र मंडळ. काल्पनिक देखावे (बक्षिसपात्र) – अखिल गणेश बाग मित्र मंडळ. सामाजिक देखावे – नवयुग मित्र मंडळ (प्रथम), हनुमान मित्र मंडळ (द्वितीय). सजीव देखावे – अजंठा मित्र मंडळ (प्रथम), भैरवनाथ मित्र मंडळ (द्वितीय).

३) उत्तर विभाग :- काल्पनिक देखावे (बक्षिसपात्र) -अमर मित्र मंडळ. सजीव देखावे – अष्टविनायक मित्र मंडळ (प्रथम), नॅशनल यंग क्लब (द्वितीय), गवळीवाडा तरुण मंडळ (तृतीय). सोसायटी (बक्षिसपात्र) – राम सोसायटी. सामाजिक देखावे – जनतानगर मित्र मंडळ (प्रथम), नवज्योत मित्र मंडळ (द्वितीय), शिवराज मित्र मंडळ (तृतीय).

४) दक्षिण विभाग :- युगंधर मित्र मंडळ (प्रथम), सरिता विहार स.गृह.संस्था मर्यादित (द्वितीय), सुंदर गार्डन मित्र मंडळ (तृतीय). सजीव देखावे (बक्षिसपात्र) – दर्शन मित्र मंडळ. काल्पनिक देखावे (बक्षिसपात्र) – धनवट पाटील गणेशोत्सव मंडळ. सांस्कृतिक देखावे (बक्षिसपात्र) – अखिल चैतन्यनगर मित्र मंडळ. सोसायटी – सावंत विहार फेज ३ (प्रथम), ओंकारस्वरुप को.आॅप.हाऊसिंग सोसायटी (द्वितीय). ऐतिहासिक देखावे (बक्षिसपात्र) – रामेश्वर मित्र मंडळ. सामाजिक देखावे – प्रभात मित्र मंडळ (प्रथम), अष्टविनायक मित्र मंडळ (द्वितीय).

५) मध्य (उत्तर) विभाग :- गरुड गणपती गणेशोत्सव मंडळ (प्रथम), वीर हनुमान मित्र मंडळ (द्वितीय), मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (तृतीय). सामाजिक देखावे – श्री पोटसुळ्या मारुती मंडळ (प्रथम), मुठेश्वर मित्र मंडळ (द्वितीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – अश्विनी मित्र मंडळ (प्रथम), माती गणपती मंडळ (द्वितीय), सर्वोदय मित्र मंडळ (तृतीय). वैज्ञानिक देखावे (बक्षिसपात्र) – जयहिंद मित्र मंडळ. सजीव देखावे – सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (प्रथम), ओम हरी हरेश्वर मित्र मंडळ (द्वितीय). सांस्कृतिक देखावे – सो.क्ष.कासार गणेशोत्सव मंडळ (प्रथम), श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान (द्वितीय). काल्पनिक देखावे (बक्षिसपात्र) – श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट.

६) मध्य (दक्षिण) विभाग :- जय जवान मित्र मंडळ (प्रथम), साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर ट्रस्ट (द्वितीय), कस्तुरे चौक तरुण मंडळ (तृतीय), शिवशक्ती मित्र मंडळ व हिंदमाता तरुण मंडळ (उत्तेजनार्थ). सजीव देखावे – नवभारत सेवक मंडळ (प्रथम), जय जवान समता मंडळ (द्वितीय), श्री शिवाजी मित्र मंडळ (तृतीय). सामाजिक देखावे (बक्षिसपात्र) – समाज विकास मंडळ. धार्मिक/ पौराणिक देखावे – पद्मशाली सम्राट मंडळ (प्रथम), शिवांजली मित्र मंडळ (द्वितीय). सोसायटी – श्री सुभाषनगर मांडीवाले वसाहत गणेश मंडळ (प्रथम), बी.यु.भंडारी सह.गृ.संस्था मर्यादित (द्वितीय), वास्तुशारदा सह.गृ.संस्था मर्यादित (तृतीय). सांस्कृतिक देखावे – अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव (प्रथम), लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट – विंचूरकर वाडा (द्वितीय). काल्पनिक देखावे – शिवशक्ती मित्र मंडळ (प्रथम), श्री गजानन मित्र मंडळ (द्वितीय), गणेश मित्र मंडळ (तृतीय). ऐतिहासिक देखावे – देशप्रेमी मित्र मंडळ (प्रथम), अष्टविनायक मित्र मंडळ (द्वितीय).

७) श्री गणेशोत्सव विशेष पारितोषिक :- अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट (जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे).

८) महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :- भैरवनाथ तरुण मंडळ (१०० वर्षे), समस्त गावकरी मंडळ (७५ वर्षे), शिवप्रताप मित्र मंडळ (२५ वर्षे).

९) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणारी मंडळे :- आझाद मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, आदर्श तरुण मंडळ, स्वस्तिश्री सह.गृ.संस्था मर्यादित.

१०) शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :- नवीन मराठी शाळा (प्रथम), एस.व्ही.युनियन हायस्कूल (द्वितीय), कामायनी विद्यामंदिर (तृतीय), बाल कल्याण संस्था, औंध रोड व मूक बधिर शिक्षण व संशोधन विभाग आपटे प्रशाला (उत्तेजनार्थ).

तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात/ वृत्तवाहिनीवर फोटोसह प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.

IMG_20190816_141134
IMG_20190816_141045
Dagdusheth Ganpati