दिनांक :- १५ सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati अंगारकी चतुर्थीनिमित्त ‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक आणि गणेशयाग-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट; प्रख्यात गायक अमोल पटवर्धन यांची गायनसेवा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी स्वराभिषेक, गणेशयाग यांसह धार्मिक विधी पार पडणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

मंगळवारी पहाटे ४ ते ६ या वेळेत स्वराभिषेकांतर्गत प्रख्यात गायक अमोल पटवर्धन यांची गायनसेवा गणपती मंदिरामध्ये होणार आहे. तसेच सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग होणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच अभिषेक, गणेश याग यांसह विविध धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडणार आहेत. भाविकांसाठी मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. तरी अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा
about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

J11
J06
J05