दिनांक :- १५ जुलै २०१८

dagdusheth ganapati
जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ५५० गरजू विद्यार्थ्यांची रविवारी आरोग्य तपासणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ५५० गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्याची साथ मिळावी, यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा येथे होणार आहे. शिबीरात ट्रस्टच्या कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील ३० मुलांची देखील तपासणी केली जाणार आहे.

शिबिराचे यंदा ८ वे वर्ष आहे. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्या संदर्भात असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे. डॉ. संजीव डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली २० डॉक्टर्स विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत. पोटदुखी, कंबरदुखी, सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्यविषयक तक्रारींसदर्भात तपासणी केली जाणार आहे. शिबिरात आरोग्य तपासणीसह नेत्र तपासणी देखील होणार आहे. तसेच यावेळी ज्या विद्यार्थ्यांना चष्मे लागले असतील, अशांना मोफत चष्मे देखील देण्यात येतील. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेअंतर्गत पुणे शहरातील ५२ शाळांमधील ५५० गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ५५० गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन येत्या रविवारी करण्यात आले आहे.[/vc_row_inner]