दिनांक :- १४ जुलै २०१९

dagdusheth ganapati आजच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कौशल्यासोबत मनोबल महत्वाचे-
एम.सी.ए चे माजी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आपटे यांचे मत : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने विद्यार्थी कौतुक सोहळा व शालेय साहित्याचे वाटप

पुणे : जेव्हा तुम्ही अभ्यासाबरोबर इतर गोष्टी करता, तेव्हा तुम्हाला आजुबाजूला काय परिस्थिती आहे याची जाणीव होऊ लागते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, व्यक्तीमत्व विकास, फिटनेस आणि विविध कौशल्य अंगी असणे महत्वाचे आहे. आजच्या पिढीतील तरुणांमध्ये मनोबल कमी असल्यामुळे १८ वर्षांपुढील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी विविध कौशल्य असणे जास्त महत्वाचे आहेच, परंतु त्याबरोबर मनोबल देखील तितकेच महत्वाचे आहे, असे मत एम.सी.ए चे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले. यावेळी इन्फोसिसचे सिनियर मॅनेजर मंदार कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूयर्वंशी, सुनील रासने, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, डॉ.अ.ल.देशमुख, अरुण भालेराव, नविन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ, एकलव्य नोटबुकचे संचालक महेश कराळे, चंद्रकांत निनाळे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, विश्वास पलूसकर, अक्षय गोडसे, विनायक रासने आदी मान्यवर उपस्थित होते.

योजनेतील विद्यार्थी समाधान कांबळे म्हणाला, आपण नेहमी इतरांचे आभार मानतो, परंतु आपल्या माणसांचे आभार मानत नाही. आपल्या जवळच्या माणसांमुळे आपण घडलेलो असतो, त्यामुळे प्रथम मी ट्रस्टचे आभार मानतो. माझ्या शिक्षणासाठी आर्थिक मदत हा खूप महत्वाचा मुद्दा होता. ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जातेच, परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील तितकेच प्रयत्न केले जात आहेत.

अशोक गोडसे म्हणाले, गणरायाच्या चरणी आलेली देणगी समाजातील उपेक्षित घटाकांसाठी कशी वापरता येईल, याचा विचार करून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यातूनच आर्थिक परिस्थिती बेताची असणाºया गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत मदत दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. मंदार कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

DSC_4306
DSC_4304
DSC_4303