दिनांक :- १२ नोव्हेंबर २०१९

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ गणपतीला ५२१ मिष्टान्नांचा महानैवेद्य-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त १ लाख दिव्यांनी सजले मंदिर

पुणे : बाप्पाभोवती विविध प्रकारच्या फळांची व भाज्यांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट मांडण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तब्बल ५२१ प्रकारच्या मिष्टान्नांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. तसेच कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे १ लाख दिव्यांनी मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.बिपीन विभुते यांसह ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला. कार्यक्रमाचे यंदा २१ वे वर्ष होते.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये ५२१ हून अधिक मिष्टान्नांचा अन्नकोट आणि १ लाख पणत्यांचा दीपोत्सव करण्यात आला.

T18
T17
T15
T14
T13
T10
T09
T07
T06
T02
T01