दिनांक :- १२ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
रसिकांनी अनुभवली हिंदी चित्रपटातील नृत्ये व गीतांची अनोखी सफर
पुरुषोत्तम बेर्डे व सहका-यांचा म्युझिकल ट्रेण्ड्स कार्यक्रम; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन

पुणे : हिंदी चित्रपटातील संगीतकारांनी अनेक प्रकारांमध्ये संगीतबद्ध करून अजरामर केलेल्या गीतांच्या कार्यक्रमात रसिक दंग झाले. विविध धाटणीच्या गीतांचा आगळा वेगळा कार्यक्रमाला रसिकांची मने जिंकली. हिंदी चित्रपटातील नृत्य, गीत व संगीताची अनोखी सफर रसिकांनी अनुभवली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुरुषोत्तम बेर्डे व सहका-यांचा म्युझिकल ट्रेण्ड्स हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात कल्याणजी आनंदजी, ओ. पी. नय्यर, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन अशा अनेक दिग्गज संगीतकारांची कारकीर्द उलगडली. संगीतकारांनी कालानुरुप संगीतात बदल करीत आपल्या वेगळ्या शैलीने अनेक गीतांना सजविले. उडे जब जब जुल्फे तेरी…, यारी है इमान मेरा…, मधुबन मै राधिका…, मै जिंदगी का साथ…, ए मेरी जोहराजबी…, नैनो मे बदरा छाये… अशा विविध गीतांनी संगीतकारांच्या अलौकिक प्रतिभेचे गीते व नृत्यामधून दर्शन घडले. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य पुरुषोत्तम बेर्डे यांचे होते.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये म्युझिकल ट्रेण्ड्स या कार्यक्रमात सादरीकरण करताना प्रख्यात कलाकार.

B 7
B 6
B 5
B 4
B 3
B 2
B 1