दिनांक :- ११ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
शास्त्रीय संगीत, ठुमरी, भजन गायनाने रंगली स्वररंग मैफल
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवात स्वररंग कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक संगीत प्रकारांच्या निर्मळ स्वरांमध्ये एकरुप झालेल्या गानसंध्येची रसिकांनी अनुभूती घेतली. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनी संगीताचे विविध पैलू उलगडत रसिकांनी सुश्राव्य संगीत मैफलीची अनुभूती दिली. शास्त्रीय संगीत, ठुमरी, भजन गायनाने स्वररंग मैफल रंगली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचा स्वररंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात पुरिया धनश्री रागाने झाली. या रागातील गाईये हरी नाम… मुश्कील करो आसान ख्वाजा मोरे… या बंदिशींनी रसिकांची मने जिंकली. शोभा गुर्टू यांनी गायलेल्या अखियन डारोजी गुलाल… या ठुमरीने आशा खाडिलकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संत नामदेवांची रचना असलेल्या व बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेल्या अमृताहूनी गोड नाम तुझे देवा… या अभंगाने रसिकांना अमृतानुभव दिला. राम जपावा… या भक्तीगीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
आशा खाडिलकर यांची कन्या गायिका वेदश्री ओक यांनी सहगायन केले. उदय कुलकर्णी (हार्मोनियम), प्रसाद पाध्ये (तबला), नंदू भांडवलकर (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ), मधुरा गुर्जर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. समीरा गुजर यांनी निवेदन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये आयोजित स्वररंगकार्यक्रमात सादरीकरण करताना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर.

sk6
sk2
sk5
sk1
sk4
sk3