दिनांक :- १० सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati ‘दगडूशेठ’ गणपतीच्या दर्शनाला ‘मंगलमुखी’ तृतीयपंथी-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत केली तृतीयपंथीयांनी श्रीं ची आरती

पुणे : सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ आज दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टमधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवसभरात गणरायाचे दर्शन घेण्याकरीता आर्यलँड देशातील नागरिक, इंदिरा ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या अध्यक्षा तरीता शंकर, ब्रिगेडियर कुलदीप सिंग, भिवंडी महापालिका आयुक्त अशोककुमार रणखांब, साहित्यिक प्रा.मिलिंद जोशी, अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हजेरी लावली. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. श्रीमंत मोरया गोसावी प्रतिष्ठानच्यावतीने गणपतीला १५१ किलोचा राजगिरा मोदक अर्पण करण्यात आला.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आरती करताना तृतीयपंथी.

T06
T04
S08
S07
S06
S05
S04
S03
S02
S01