--कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढील सरकारी आदेशापर्यंत मंदिर बंद राहील.-- ०७ ऑगस्ट २०२०, शुक्रवार, संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:४५ वाजता (पुणे), २२ ऑगस्ट २०२०, शनिवार - विनायकी चतुर्थी

आपले नाव (आवश्यक)

आपला ई-मेल (आवश्यक)

आपला मोबाईल (आवश्यक)

आपले शहर (आवश्यक)

Enter Captcha
captcha

एक सुगंधित सोहळा

चंदनाची वासंतिक उटी लावून श्री गणपती-मूर्तीची पूजा करणे ही या मंदिराची चालत आलेली पद्धत आहे. अस्सल चंदनाची पूड आणि खास म्हैसूरहून मागवलेली सुगंधी द्रव्ये यांच्यापासून ही उटी बनवली जाते.

श्री गणपतींच्या चांदीच्या मूर्तीला ही उटी लावली जाते. जवळजवळ दहा हजार मोगऱ्याची फुले या मूर्तीला वाहिली जातात. मंदिराचा सारा परिसरच चंदनाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांच्या सुवासाने घमघमून जातो. ह्या ऋतूत विपुल प्रमाणात मोगऱ्याची फुलं मिळतात. त्यामुळे मंदिराचा गाभारा, भिंती, खांब आणि मंदिराचा कोपरान् कोपरा मोगऱ्याच्या फुलांनी सुशोभित केला जातो.

हा मधुर सुवास आणि शुभ्र पांढऱ्या फुलांच्या कलात्मक रचना यामुळे एक अद्‍भुत वातावरण तयार होते; आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक अलौकिक आनंद भरून राहातो. मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळावर इथले पुजारी चंदनाचा टिळा लावतात.

श्री गणपतींच्या पवित्र स्तोत्र-गायनाच्या व प्रार्थनांच्या सूर-तालांनी सबंध मंदिर भरून जाते. चंदनाची उटी आणि मोगऱ्याची हजारो फुले, तसेच जुई व चाफा यांसारखी सुवासिक फुले या सगळ्यांमुळे इथले वातावरण जणू स्वप्नवत् होऊन जाते. इथे येणारे भाविक पुणेकर नेहमीच या प्रसंगाची सुवासिक आठवण बरोबर घेऊन जातात आणि नंतरही ती मनात जपतात.

 • मोगरा महोत्सव २०१८
 • मोगरा महोत्सव २०१८
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image23
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image18
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image21
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image20
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image25
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_08
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_07
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_06
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_05
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_04
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_03
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_02
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५
 • Dagadushethganapati_Mogara-festival-2015_01
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१५