--कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढील सरकारी आदेशापर्यंत मंदिर बंद राहील.-- ०७ ऑगस्ट २०२०, शुक्रवार, संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:४५ वाजता (पुणे), २२ ऑगस्ट २०२०, शनिवार - विनायकी चतुर्थी

आपले नाव (आवश्यक)

आपला ई-मेल (आवश्यक)

आपला मोबाईल (आवश्यक)

आपले शहर (आवश्यक)

Enter Captcha
captcha

आंबा महोत्सव

दरवर्षी अक्षयतृतियेला श्रीगणेशाला आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. भारतात आंबा हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला आंबा हा गुणवत्तेत आणि चवीत सर्वोत्तम समजला जातो आणि त्याला जगभरातून मागणी असते. किंबहुना हापूस आंब्याला फळांचा राजाच म्हटले जाते.

अक्षयतृतियेच्या दिवशी या सोनेरी-तांबूस रंगाच्या रसरशीत फळाला श्रीगणेशांच्या चरणी वाहिले जाण्याचा मान दिला जातो. पुण्यातील ’देसाई बंधू आंबेवाले’ हे आंब्यांचे अग्रेसर व्यापारी ११,००० आंब्यांचा भरघोस नैवेद्य श्रीगणेशांच्या चरणी अर्पण करतात. मंदिराचा परिसर पिकलेल्या, सोनेरी रंगाच्या आंब्यांनी भरून गेलेला असतो आणि त्या आंब्यांचा मंद सुवास कानाकोपऱ्यात भरून रहातो. मंदिराला भेट देणारे भक्त आणि माध्यमांचे कर्मचारी हे अद्‍भुत् दृश्य बघायला आणि आपल्या कॅमेऱ्यांमधे बंदिस्त करायला मोठ्या संख्येने हजर असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना हजारो आंबे वाटले जातात.

गेल्यावर्षी ससून इस्पितळातल्या रुग्णांना आंबा-महोत्सवातले १४०० आंबे वाटण्यात आले.

युरोपमधे आंब्यांवर घातलेली बंदी उठवली जावी म्हणून ’देसाई बंधू आंबेवाले ’चे मालक श्री. मंदार व सौ. मैत्रेयी देसाई यांनी अभिषेक व गणेश-याग करून देवाला साकडे घातले. या प्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती हाही एक सन्मानाचा भाग होता. त्यांनी विनयाने उल्लेख केला की या मंदिराच्या बांधकामाच्या कामात त्यांचाही छोटासा सहभाग होता. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मनापासून व्यक्त करताना आम्हालाही अतिशय आनंद वाटला.

 • आंबा महोत्सव २०१८
 • आंबा महोत्सव २०१८
 • Amba_Website_Images_3
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७
 • Amba_Website_Images_2
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७
 • Amba_Website_Images_1
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१७
 • Dagadusheth_Amba-Festival2015_06
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५
 • Dagadusheth_Amba Festival2015_05
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५
 • Dagadusheth_Amba Festival2015_04
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५
 • Dagadusheth_Amba Festival2015_03
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५
 • Dagadusheth_Amba Festival2015_02
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५
 • Dagadusheth_Amba Festival2015_01
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव २०१५